मुंबई : गेल्याच आठवड्यात ८ आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्यानंतर आताही ४ आयएएस अधिका-यांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांची वर्ध्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तर अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे यांची बदली पुण्यातील यशदाचे उपसंचालकपदी करण्यात आली आहे.
नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांच्याकडे आता अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी असेल. तर वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिथिन रहमान यांच्याकडे आता बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी असेल.
कोणत्या अधिका-याची बदली कुठे?
१. पराग सोमण मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२. सचिन कळंत्रे महापालिका आयुक्त, अमरावती महानगरपालिका, अमरावती यांची यशदा, पुणे येथील उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. सौम्या शर्मा-चांडक मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची महापालिका आयुक्त, अमरावती महानगरपालिका, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. जिथिन रहमान मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.