नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी आयुष्मान कार्ड आरोग्य सुरक्षा सुविधा एक चांगली योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी ५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा मिळते. यादीत असलेल्या खासगी रुग्णालयातदेखील उपचाराची सुविधा मिळते. परंतु या कार्डचा उपयोग वर्षभरात किती वेळा करता येतो, याबाबतचा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत आहे. त्यावर केंद्र सरकारने खुलासा केला असून, वर्षभरात ५ लाखांपर्यंतचे उपचार कितीही वेळा घेता येतात. त्यामुळे एखाद्या रुग्णाला त्या योजनेअंतर्गत पुन्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेणे शक्य आहे. मात्र, पाच लाखांवर खर्च झाल्यास वरचा खर्च रुग्णाला द्यावा लागणार आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्मान भारत कार्ड जारी केले जाते. हे कार्ड आरोग्य खात्याशी जोडलेले आहे आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत दर्जेदार वैद्यकीय सेवा आणि लाभ दिला जातो. हे कार्ड सर्व पात्र लाभार्थ्यांना परवडणारे असून याद्वारे सुलभ आरोग्यसेवा दिली जाते. या कार्डमुळे रुग्णांवर कॅशलेस उपचार होणार आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांची अडचण दूर होणार आहे. अर्थात या कार्डमुळे तब्बल ५ लाखांपर्यंतच्या खर्चाचे कव्हर मिळते. याचा फायदा रुग्णाला होता.
या योजनेतंर्गत उपचारांच्या संख्येवर मर्यादा नाही. उपचारांची कोणतीच निश्चित मर्यादा नाही. लाभार्थी त्याच्या गरजेनुसार वर्षभरात अनेकदा कार्डचा वापर करू शकतो. पण हा खर्च करण्यासाठी ५ लाखांची मर्यादा निश्चित आहे. ५ लाखांच्या मर्यादेत वार्षिक खर्च करता येतो. म्हणजे या योजनेंतर्गत ५ लाखांच्या मर्यादेपर्यंत जितक्यांदा गरज आहे, तोपर्यंत उपचार घेता येतो, असा नियम आहे. त्यामुळे वर्षभरात ५ लाखांपर्यंत रुग्णालयात मोफत उपचार घेता येतात. त्यामुळे रुग्णांची सोय झाली आहे.
आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी अर्जदाराला जवळच्याच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल. तिथे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासतो. तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होते. त्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. अर्ज स्वीकारल्यानंतर लाभार्थी काही वेळेत आपले कार्ड डाऊनलोड करू शकतो.
गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी योजना
ही योजना खास करून गरीब आणि गरजू कुटुंबासाठी तयार करण्यात आली आहे. जे लोक संघटित क्षेत्रासाठी काम करतात. नियमितपणे आयकर भरतात. पगारदार आहेत आणि त्यांचा पीएफ कपात होतो. ते या योजनेसाठी पात्र समजल्या जातात तर ईएसईसी लाभ घेणा-या आणि सरकारी नोकरी करणा-या व्यक्तींनाही या योजनेचा लाभ देण्यात येत नाही. हे सर्व या योजनेच्या परीघाबाहेर आहेत.

