नाशिक : कुंभमेळ्यानिमित्त राष्ट्रपतींसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौ-यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर ३० ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस, तसेच ३१ तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत भाविकांसाठी बंद राहील. केवळ स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाकडून पास मिळालेल्या भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानिमित्त राष्ट्रपती, राज्यपाल यांच्यासह अतिमहत्त्वाच्या व्यक्ती त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, गर्दी व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक, नगरपरिषद मुख्याधिकारी, देवस्थान ट्रस्ट सचिव यांच्या अभिप्रायानुसार मंदिर शुक्रवारी, ३० तारखेला संपूर्ण दिवस, तर ३१ तारखेला सायंकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजे एकूण ४२ तास र्त्यंबकेश्वर येथील रहिवाशी वगळता इतर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येईल, तसेच जिल्हा प्रशासनाकडून पास मिळालेल्या व्यक्तींनाच दर्शन घेता येणार आहे, असा आदेश जिल्हाधिका-यांनी जारी केला आहे.
















