20.6 C
Latur
Friday, December 5, 2025
Homeनांदेडकॅनालच्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू

कॅनालच्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू

निमगांव येथील घटना

अर्धापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील निमगांव येथील एका बंजारा समाजाच्या कुटुंबांतील दोन लहान मुले खेळत – खेळत घरासमोर असलेल्या कॅनालमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून दोन लहान बालकांचा मृत्यू झाल्याची घटना दि. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे. या दोन बालकांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

निमगांव येथील राम राठोड यांची मुलगी श्रावणी विठ्ठल चव्हाण (रा. बेलखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ) आपल्या मुलाबाळांसह दिपावली सणानिमित्त माहेरी निमगांव येथे आली होती. त्याच दरम्यान त्यांच्या मुलींची मुलगी श्रावणी विठ्ठल चव्हाण (३ वर्षे) आणि राम राठोड यांच्या मुलाचा मुलगा स्वस्तिक सचिन राठोड(अडीच वर्षे) ही दोन बालके सोमवारी दुपारी घरासमोर असलेल्या कॅनालकडे गेली. या कॅनालमधील एका खड्डयात साचलेले पाणी होते. खेळत-खेळत ही दोघे त्या पाण्यात पडली. हे कोणाच्या लक्षात आले नाही.

थोड्या वेळाने आपली मुले घरी दिसत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी गावांत इतर कुटुंबाकडे त्यांची चौकशी करून मुलांची शाधाशोध सुरु केली. संपूर्ण दिवसभर शोधाशोध केल्यानंतर घरासमोरील कॅनाल परिसरात पाहणी केली असता सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास स्वास्तिक सचिन राठोड आणि श्रावणी विठ्ठल चव्हाण या दोघांचेही मृतदेह कॅनालमधील खड्डयात साचलेल्या पाण्यात सापडले. या लहान बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. शेवटी पोलीस कारवाई पूर्ण करून त्या दोन बालकांचा मृतदेह निमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला. परंतू तेथे उतरिय तपासणीची सोय नसल्यामुळे या दोन्हीही बालकांचे मृतदेह नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे निमगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR