20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरकेवळ १० तासांत एकाच ठिकाणी दोन सारखेच अपघात

केवळ १० तासांत एकाच ठिकाणी दोन सारखेच अपघात

दोन्ही अपघातात चालकच किरकोळ जखमी

छत्रपती संभाजीनगर : शहरात वर्दळीच्या जालना रोडवर आज दिवसभरात एकाच ठिकाणी दोनवेळा वेगवेगळ्या गाड्यांचे अपघात झाल्याची घटना घडली आहे. जालना रोडवरील राज पेट्रोलसमोर हे दोन्ही अपघात झाले आहेत. पहिला अपघात सकाळी साडेआठ वाजता तर दूसरा अपघात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झाला. दोन्ही चारचाकी उलटून पडल्याने जालना रोडवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प पडली होती.

छत्रपती संभाजीनगर ते जालना हा मार्ग शहरातून जात असून मुख्यमार्ग आहे. यावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. आज सकाळी साडेआठ वाजता एक जीप ( एमएच ४८ – एडब्ल्यू ५५९४) सेव्हन उड्डाणपूलाकडून सिडकोकडे जात होती. यावेळी राज पेट्रोल पंपसमोर अचानक एक सायकलस्वार समोर जीपच्या समोर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने जीप वेगाने बाजूला वळवली. यामुळे दुभाजकावर आदळून जीप उलटली. सुदैवाने सायकल चालक, आणि जीप चालक दोघेही सुखरूप आहेत. या अपघाताने या मार्गवारील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प. वाहतूक पोलिसांनी क्रेन आणून रस्त्यावरील वाहन दूर केले.

दरम्यान, याच ठिकाणी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सेव्हन उड्डाणपुलाहून सिडकोकडे जाणारी एसयूव्ही कार (एमएच २० इवाय ७२४४ ) अचानक उलटली. प्राथमिक माहितीनुसार चालकाने वेगात असताना ब्रेक दाबल्याने कार हवेत उडून रस्त्यावर उलटली. या अपघात देखील सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सायंकाळी वर्दळीच्या वेळी ऐन रस्त्यात कार उलटल्याने वाहतूक ठप्प झाली. सेव्हन उड्डाणपुलावर देखील वाहतूक खोळंबा झाला.

चालक वगळता गाड्या होत्या रिकाम्या
सकाळी आणि सायंकाळी झालेल्या दोन्ही अपघातग्रस्त गाडीत फक्त चालक होते. गाडी उलटल्यानंतर देखील दोन्ही चालकांना सुदैवाने किरकोळ इजा झाली आहे. एकाच ठिकाणी दहा तासांच्या अंतराने गाडी उलटून सारखाच अपघात झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR