15.2 C
Latur
Wednesday, November 12, 2025
Homeमहाराष्ट्रआरोप करणा-या रिक्षा चालकाच्या मुलीचा यूटर्न

आरोप करणा-या रिक्षा चालकाच्या मुलीचा यूटर्न

मानले गौतमी पाटीलचे आभार

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडवर गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झाला. कारने रिक्षाला मागून जबर धडक दिल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. मात्र, गार कारचालक तेथून पळून गेला. काही वेळानंतर रिक्षा चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत नसली तरी गाडी तिची असल्यामुळे चर्चा सुरु होती. कारची मालक असलेल्या गौतमीने मदत न केल्यामुळे संबंधित रिक्षा चालकाच्या मुलीने गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले होते. मात्र, आता तिच मुलगी गौतमी पाटीलसोबत दिसून आली. इतकच नाही तर तिने गौतम पाटीलचे आभार देखील मानले.

जे काही आरोप केले होते ते आम्हाला पुरावे मीळत नव्हते. आता मला पोलिस प्रशासानाने सर्व पुरावे दिले आहेत. गौतमी पाटील जरी भेटायला आल्या तरी कायदेशीर प्रक्रीया सुरू राहील. कोर्टात केस लढली जाईल. गौतमी पाटीलकडून मी कोणतीही मदत घेतली नाही. माणुसकी म्हणुन गौतमी पाटील आम्हला भेटायला आल्या आहेत. काल त्या भेटायला आल्या होत्या. वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्याकडून पैसे काढायचा प्रयत्न केला आशी त्यांनी माहिती दिली. आम्ही कोणतीही १० लाख, १५ लाख रूपयाची मागणी केली नाही.

गौतमी पाटील यांनी आम्हाला कधीही मदत लागली तर ती द्यायला तयार आहे असे सांगितले. परंतु आता तरी मी सध्या समर्थ आहे. माझ्या वडिलांची काळजी घ्यायला. गौतमी पाटील यांनी आमची हालहवाल माहिती घ्यावी हिच इच्छा होती. त्या आल्या त्यांनी भेट घेतली आहे असे रिक्षाचालकाची मुलगी अपर्णा मरगळे यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR