24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeराष्ट्रीयउदयनिधीचे विधान हेट स्पीच

उदयनिधीचे विधान हेट स्पीच

उच्च न्यायालयाचा निर्णय

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी आता मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी वापरलेली भाषा ही नरसंहाराकडे इशारा करते आणि असे विधान हेट स्पीचच्या श्रेणीत येते, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

याबाबत सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने सांगितले की जर सनातन धर्माचे पालन करणारे लोक अस्तित्वातच राहत कामा नये असे म्हटले गेले तर त्यासाठी नरसंहार हा योग्य शब्द ठरतो. जर सनातन धर्माला एक धर्म मानले गेले, तर असे विधान रिलिजिसाइड अर्थात धर्माच्या विनाशाच्या श्रेणीत येते असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले.

कोर्टाने पुढे सांगितले की, अशा प्रकारची भाषा ही कुठल्याही पद्धतीने का असेना लोकांच्या संहाराच्या दिशेने इशारा करते. त्यामध्ये इकोसाइड, फॅक्टोसाइड आणि कल्चरसाइडसारख्या शब्दांचा समावेश आहे. यावेळी उदयनिधी स्टॅलिन यांनी तामिळ भाषेत वापरलेल्या सनातन ओझिप्पू या शब्दाची व्याख्या करताना कोर्टाने सांगितले की, याचा स्पष्ट अर्थ सांस्कृतिक नरसंहार किंवा संस्कृतीच्या निर्मुलनाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत मंर्त्यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणा-या सोशल मीडिया पोस्टनां हेट स्पीच मानता येणार नाही.

एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाबाबत सवाल उपस्थित करण्यात आले होते. तसेच उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेलं विधान म्हणजे सनातन धर्माचं पालन करणा-यांविरोधात नरसंहार करण्याचं आवाहन असल्याची टीका केली होती. मात्र नंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी आपलं विधान चुकीच्या पद्धतीने मांडलं गेल्याचा दावा केला होता. त्यावर सुनाावणी करताना कोर्टाने हा निवाडा दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR