26.3 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeसोलापूरउद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र यावे

उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र यावे

माजी खासदार इम्तीयाज जलील यांचे प्रतिपादन

सोलापूर : उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात मतभेद असतील. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात जातीचे राजकारण केले नाही. भारतीय जनता पार्टीला सत्तेतून उतरवायचे असेल तर महाराष्ट्रामध्ये हे दोघेही एकत्र येणे गरजेचे आहे असे माजी खासदार इम्तियाज जलील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत ‘एआयएमआयएम’ पक्ष सोलापुरात स्वतंत्र निवडणूक लढविणार आहे. मात्र, याचे सर्व अधिकार हे फारुक शाब्दी यांच्याकडे असतील. एवढंच नव्हे, तर नगर परिषदा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही आमचे उमेदवार असतील, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर दौ-यात जलील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या १० ते १२ वर्षापासून आमच्या पक्षाला जातीवादी म्हणून संबोधले जात होते. नात्र, आमचे काम पाहून आता ती स्थिती काहिली नाही.

निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आमच्या पक्षामुळे झाला, असे बोलले जात होते. तसे होऊ नये म्हणून आम्ही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे युतीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्यांनी आम्हाला सोबत घेतले नाही. महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही स्थानिक नेत्यांना सर्व अधिकार दिले आहेत. मात्र, आम्हाला त्यातून निकाल दिसला पाहिजे. मागील निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाला एक लाखापेक्षा जास्त मते मिळाली आहेत.

आम्ही कुठे कमी पडलो याचा अभ्यास करून काम करणार आहोत. सर्व समाजाला सोबत घेऊन निवडणुका लढणार असल्याचेही इम्तियाज जलील यांनी सांगितले. यावेळी ‘एआयएमआयएम’चे शहराध्यक्ष फारुक शाब्दी, निरीक्षक अन्वर सादात, शौकत पठाण, अजहर हुंडेकरी आदी उपस्थित होते. मी भ्रष्टाचाराबाबत बोलल्यानंतर मला समाजकल्याणमंत्र्यांनी नोटीस पाठवणार असल्याचे बोलले होते. खरं तर मी भ्रष्टाचाराबाबत न्यायालयात जाणार होतो. मात्र, आता तसे करणार नाही, ते मला नोटीस पाठवणार आहेत.

त्यांनी लवकरच मला नोटीस पाठवावी, मी कोर्टात उत्तर देतो, असे यावेळी इम्तियाज जलील म्हणाले. निवडणूक आयोगाबाबत राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखाशी मी सहमत आहे. निवडणुकीत मला शेवटपर्यंत ५६ हजारांचा लीड होता. शेवटच्या टप्प्यात लीड तुटतो आणि पराभव होतो, हे कसे शक्य आहे, असाही सवाल त्यांनी यावेळी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR