नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज तीन दिवसांच्या दिल्ली दौ-यावर गेले आहेत. या दौ-याच्या पहिल्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी सौ. रश्मी उद्धव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, नेते व खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, खासदार फौझिया खान, खासदार अमोल कोल्हे, खासदार संजय दिना पाटील, खासदार निलेश लंके, खासदार भास्कर भगरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार मिलिंद नार्वेकर व सलील देशमुख हे देखील उपस्थित होते.

