26.1 C
Latur
Friday, December 8, 2023
Homeलातूरउदगीर नगरपालिकेकडून वृक्ष लागवडीला बळ

उदगीर नगरपालिकेकडून वृक्ष लागवडीला बळ

उदगीर : प्रतिनिधी
शहरात सातत्याने बेकायदा वृक्षतोड होत आहे. उदगीर नगरपालिकेकडून वृक्ष लागवडीला बळ देत असताना वृक्षावर कुराड चालवली जात आहे. याबाबतच्या वाढत्या तक्रारी येत असल्यामुळे नूतन मुख्य अधिकारी एस.ए.बोंदर यांनी संबंधित विभागाला सदरच्या वृक्षतोड संदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत.

उदगीर शहरात हरित क्षेत्राचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी वृक्ष संवर्धनाबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी व अत्यंत गरजेचे परिस्थिती असेल तरच परवानगीने वृक्षतोड अथवा वृक्षाच्या फांद्या तोडाव्यात असे आव्हान मुख्यधिकारी एस.ए.बोंदर यांनी केले आहे. राष्ट्रीय वन निती १९८८ मधील देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वनीकरण असणे आवश््यक आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण २० टक्के आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी विविध अभियान राबवण्यात येणार असल्याचेही यावेळी मुख्यधिकारी यांनी सांगितले आहे. सध्या स्थिती पाहता उदगीर शहरामध्ये विनापरवाना वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालली आहे. शहरातील नागरिकांकडून स्वत:च्या जागेतील व जागेतील हद्दीतील वृक्षाची किरकोळ कारणासाठी कत्तल केली जात आहे. नागरिकांनी याबाबत जागृत होऊन झाडाच्या मुळावर घाव न घालता फांद्या कमी करण्यावर भर द्यावा अशी सूचना नगरपालिकेकडून करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR