33.7 C
Latur
Thursday, March 27, 2025
Homeमहाराष्ट्रकेंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांनी काढली छेड

केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांनी काढली छेड

जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली आहे. मुक्ताईनगर कोथळी या ठिकाणी ही घटना घडली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिस ठाणे गाठून टवाळखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली करत संताप व्यक्त केला आहे.

रक्षा खडसेंच्या सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसांत चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर कोथळी येथे महाशिवरात्रीनिमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. यादिवशी विविध कार्यक्रम असतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या ही येथे फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेत सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली. तेव्हा देखील हाच तरुण टवाळखोरांना घेऊन तिच्या पाठीमागे लागला. ती पाळण्यात बसली, तिथे तो तरुण सुद्धा बसला. यावेळी तरुणाने व्हीडीओ चित्रित केले. ही बाब सुरक्षारक्षकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तरुणाला मज्जाव केला. परंतु, त्याने सुरक्षारक्षकाशी झटापट केली.

छेडछाड करणा-या टवाळखोरांना अटक करावी, अशी मागणी करत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आक्रमक झाल्या आहेत. ‘‘या तरुणांना अटक झाली पाहिजे. माझे एकच म्हणणे आहे की, इतक्या सुरक्षेतही जर अशा पद्धतीने छेडछाड केली जाते, तर सर्वसामान्य मुलींचे काय होणार? असा सवाल रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिसांना विचारला आहे.

माजी मंत्री, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही भाष्य केले आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. छेड काढणारे लोक टवाळखोर नाहीत तर गुंड आहेत, असे खडसे यांनी म्हटले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, छेडछाड करणा-यांना काळ्या कपड्यात न झाकता त्यांचे चेहरे दाखवा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR