नवी दिल्ली : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करणा-या हजारो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने तांत्रिक अडचणींची दखल घेत दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. या संदर्भातील सर्वप्रथम बातमी देऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी समोर आणल्या होत्या. त्यानंतर यूपीएससीने ही मुदतवाढ दिली आहे.
यूपीएससीच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, एनडीए(२)आणि सीडीएस(२) २०२६ या परीक्षांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आता ११ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस ९ जून होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आयोगाच्या वेबसाईटचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहिले होते. विद्यार्थ्यांचा वाढता संताप आणि मुदतवाढीची मागणी लक्षात घेता आयोगाने अखेर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
नवीन सुधारित वेळापत्रक
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) जारी केलेल्या नवीन अधिकृत अधिसूचनेनुसार, सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
नवीन अंतिम तारीख
इच्छुक आणि पात्र उमेदवार आता ११ जून रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत आपले ऑनलाईन अर्ज भरू शकतात.
अर्ज दुरुस्ती विंडो
अर्ज सादर केल्यानंतर त्यात काही चुका सुधारण्यासाठी आयोगाकडून १२ जून ते १८ जून दरम्यान करेक्शन विंडो खुली केली जाईल.
















