27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeअंतरराष्ट्रीयअमेरिकेने पीओके-अक्साई चिनला भारताचा भाग सांगितले

अमेरिकेने पीओके-अक्साई चिनला भारताचा भाग सांगितले

व्यापार करारानंतर भारताचा नकाशा शेअर केला

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेने शुक्रवारी एका अंतरिम व्यापार कराराची रूपरेषा(फ्रेमवर्क) जाहीर केली. या घोषणेसोबत अमेरिकेच्या व्यापार कार्यालयाने (यूएसटीआर) भारताचा नकाशा शेअर केला. या नकाशामध्ये संपूर्ण जम्मू-काश्मीर प्रदेश, ज्यात पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि अक्साई चिन (चीनच्या ताब्यात असलेला प्रदेश) यांचा समावेश आहे, तो भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे.

हा नकाशा सोशल मीडियावर व्हायरल झाला. अमेरिका यापूर्वीच्या नकाशांमध्ये पीओके वेगळा दाखवत असे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आणि पाश्चात्त्य देशांच्या सरकारी नकाशांमध्येही वादग्रस्त भागांना वेगळ्या रंगाने किंवा डॉटेड लाइन्सने (तुटक रेषांनी) दाखवले जाते.

यावेळी ट्रम्प प्रशासनाने जाणूनबुजून किंवा नकळतपणे असा नकाशा शेअर केला, जो भारताच्या सीमांना पूर्णपणे मान्यता देतो. भारताने नेहमीच जम्मू-काश्मीरला आपला अविभाज्य भाग मानले आहे.

भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा पीओके वाद जम्मू-काश्मीर प्रदेशाशी संबंधित सर्वात जुना वाद आहे. हा १९४७ पासून सुरू आहे आणि दोन्ही देशांमध्ये युद्ध, तणाव आणि राजनैतिक संघर्षाचे कारण बनला आहे.

काश्मीर पाकचा भाग बनेल : शरीफ
अमेरिकेने हा नकाशा शेअर करून पाकिस्तानला कडक संदेश दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ५ फेब्रुवारी रोजी निवेदन जारी करून म्हटले होते की काश्मीर पाकिस्तानचा भाग बनेल. शहबाज शरीफ म्हणाले की, पाकिस्तान काश्मिरींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि जम्मू-काश्मीर विवादाचे निराकरण काश्मीरच्या लोकांच्या इच्छेनुसार झाले पाहिजे. शहबाज म्हणाले की, जम्मू-काश्मीर विवादाचे समाधान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांची अंमलबजावणी केल्यानेच होऊ शकते. ते म्हणाले मी पाकिस्तानी लोक आणि पाकिस्तानी नेतृत्वाच्या वतीने काश्मीरमधील माझ्या बांधवांसोबत एकजूटता दर्शवण्यासाठी आलो आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनी या प्रदेशाला पाकिस्तानची जीवनरेखा म्हटले होते.

काश्मीरचा मुद्दा धोरणाचा पाया
शहबाज शरीफ म्हणाले की, काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा आधार आहे. शहबाज यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे २०२५ मध्ये झालेल्या चार दिवसीय लष्करी संघर्षाचीही आठवण करून दिली. त्यांनी दावा केला की, या संघर्षानंतर काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्ण ताकदीने उचलण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR