भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर

नवी दिल्ली : नुकतेच गुजरात एटीएसने इसिसशी निगडित एक मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. ज्यात रिसिन नावाचे रासायनिक विषाचा वापर करण्याचे षडयंत्र होते. हे विष एरंडीच्या बियांपासून तयार केलेले असते. जे घराघरात सहजपणे मिळते. परंतु हे किती धोकादायक आहे? याच्या अगदी थोड्या प्रमाणातही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. याच रिसिनचा वापर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात केला असल्याचे बोलल्या जात आहे.

रिसिन ही एक पांढरी, गंधहीन आणि चवहीन पावडर आहे. ती खाल्ल्याने, श्वास घेताना किंवा इंजेक्शनने शरीरात टाकली जाऊ शकते. सुदैवाने ती संसर्गजन्य नाही. ती एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीपर्यंत पसरत नाही. हवेत सोडल्यास किंवा पाण्यात मिसळल्यास ती व्यापक नुकसान करू शकते. एरंडीच्या बियांवर प्रक्रिया झाल्यानंतर उरलेल्या कच-यांतून हे भयंकर विष तयार केले जाते. हे विष पोटात गेले तर श्वासोच्छ्वासास त्रास, घशावर सूज येते. इंजेक्शनच्या माध्यमातून ते शरीरात गेले तर शारीरिक क्रियांवर गंभीर परिणाम होऊन ते अत्यंत घातक ठरते. गुजरात प्रकरणातील आरोपी डॉक्टरने ४ लिटर एरंडेल तेल खरेदी केले आणि कच-यापासून रिसिन बनवण्याचा प्रयत्न केला.

हे विष बनवणे कठीण नाही, परंतु ते ओळखणे आणि प्रतिबंध करणे आवश्यक आहे असे तज्ज्ञ सांगतात. रिसिन जगातील सर्वात घातक विषापैकी एक आहे. हे शरीरातील आतून पेशी नष्ट करते. यावर कोणताही इलाज किंवा उतारा नाही, फक्त लक्षणांवर उपचार केले जाऊ शकतात. २०२२ मध्ये बेल्झियममध्ये एका महिलेने केस गळती रोखण्यासाठी ६ बिया खाल्ल्या, त्यातून तिला खूप वेदना, उलटी झाली परंतु वेळीच उपचार केल्याने ती वाचली. भारतात या वनस्पतीची शेतीही होते, त्याचा कचराही सहज मिळतो. त्यामुळे दहशतवाद्यांनी याचा वापर करणे पसंत केले. गुजरातच्या डॉक्टरने शहरांमध्ये हल्ला करण्याची योजना बनवली होती. मोठ्या प्रमाणात रिसिन हवेत सोडले असते तर असंख्य मनुष्यांना त्याचा त्रास झाला असता.

रिसिन कसे बनवले जाते?
एरंडीच्या बियाण्यांमधून तेल काढल्यानंतर उरणारा कचरा, ज्याला एरंडेल केक” म्हणतात, हा रिसिनचा मुख्य स्रोत आहे. दरवर्षी जगभरात २० लाख टनांहून अधिक एरंडेल बियाण्यांवर प्रक्रिया केली जाते. या कच-यापैकी ५% रिसिन असते. बियाणे कुस्करले जातात आणि गरम पाणी किंवा रसायनांचा वापर करून तेल वेगळे केले जाते. उर्वरित लगदा रिसिनने भरलेला असतो. रिसिन घरी बनवणे देखील सोपे आहे मात्र ही प्रक्रिया धोकादायक आहे. विषाचा एक छोटासा भाग देखील हवेत जाऊ शकतो आणि आजार निर्माण करू शकतो.

रिसिन म्हणजे काय?
रिसिन हे एरंडेल वनस्पतीच्या (रिसिनस कम्युनिस) बियांमध्ये आढळणारे एक प्रथिन आहे. ही वनस्पती जगभरात प्रामुख्याने तेल काढण्यासाठी लागवड केली जाते. एरंडेल तेल औषधे, साबण आणि यंत्रसामग्रीमध्ये वापरले जाते. मात्र या बियांमध्ये रिसिन नावाचे विष असते, जे इतके शक्तिशाली आहे की ते जैविक शस्त्र मानले जाते. अमेरिका आणि रशिया सारख्या देशांनी एकेकाळी ते शस्त्र म्हणून वापरण्याचा विचार केला होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31

Latest news