कुंभमेळ्याचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी वापरा

बुलडाणा : राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळा चार-पाच वर्ष पुढे ढकलावा. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी असलेला ३५हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने राज्यातील दुष्काळ निवारणासाठी वापरावा, शेतक-यांना मदत करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

दुष्काळाच्या प्रश्नावर राज्य शासन उदासीन असल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले, दुष्काळ तीव्र होत असताना सरकार नियम आणि अटी यात अडकले आहे. त्याची झळ शेतक-यांना बसत आहे.

राज्य सरकारला घोषणा महत्त्वाच्या की माणूस? असा प्रश्न तुपकर यांनी केला. ते म्हणाले, राज्य शासन सिंहस्थ कुंभमेळावर ३५ हजार कोटींचा खर्च करत आहे. शक्तीपीठ मार्गासाठी सव्वा लाख कोटी खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. राज्य सरकार अनावश्यक कामांसाठी एवढा निधी खर्च करते? हा अनेकांना प्रश्न पडला आहे. या कामांची मागणी कोणीही केलेली नाही. प्रकार मध्ये बसलेल्या ठराविक मंडळींच्या डोक्यातील ही कल्पना आहे. त्यामुळे त्याचा हेतू काय? याविषयी अनेकांना प्रश्न पडतो.

राज्यात तीव्र दुष्काळ आहे. २० तालुके वगळता सबंध राज्य दुष्काळात होरपळते आहे. यावेळी शेतकरी आणि शेतीवर अवलंबून माणूस आणि जनावरे यांना दिलासा देण्याची गरज आहे. तोच खरा माणुसकीचा धर्म म्हणता येईल. मात्र सरकार ते विसरले आहे. राज्य सरकारने सिंहस्थ कुंभमेळा चार-पाच वर्ष पुढे ढकलावा. शेतक-यांना मदत करावी, असे देखील ते म्हणाले.

आंदोलनाचा इशारा
राज्य शासनाने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारने शेतक-यांना मदत करताना नियम आणि अटी लागू नये. त्यामुळे आमची मागणी विचारात न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news