24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeअंतरराष्ट्रीय‘यूएसएस अब्राहम लिंकन’ इराणच्या वेशीवर

‘यूएसएस अब्राहम लिंकन’ इराणच्या वेशीवर

ट्रम्प हाहाकार माजवणार? विनाशकारी युद्धनौकेमुळे इस्रायलही अलर्ट मोडवर

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान, इराण चर्चेसाठी उत्सुकता दर्शवत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र असले तरी, आमची बोटे ट्रिगरवर आहेत असा इशारा तेहरानने दिला आहे. अशी एकूण परिस्थिती असतानाच अमेरिकेची सर्वात विध्वंसक युद्ध नौका यूएसएस अब्राहम लिंकन इराणच्या वेशीवर पोहोचली आहे.

यामुळे, काही तरी मोठे होण्याचे संकेत मिळत आहेत. मोठ्या युद्ध पेटू शकते, असे संकेत मिळत आहेत. ट्रम्प आपली धमकी सत्यात उतरवणार की, हा केवळ इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

यूएसएस अब्राहम लिंकन ही युद्धनौका शत्रूचा कर्दनकाळ म्हणून ओळखली जाते. ही युद्धनौका इराणच्या संपूर्ण सैन्याला पुरून उरू शकते, असे बोलले जाते. या स्ट्राइक ग्रुपमध्ये गाईडेड मिसाईल्स क्रूझर, विनाशक जहाजे आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. खरे तर, हा समुद्रात चालणारा सर्वात मोठा जंगी ताफा माणला जातो. अमेरिकेची सर्वात घातक लढाऊ विमाने यावर तैनात असल्याचे बोलले जाते.

महत्वाचे म्हणजे, ही युद्धनौका जल, थल आणि नभ अशा तिन्ही प्रकारांत मोठे नुकसान पोहोचवण्याची क्षमता ठेवते. इराणला नकाशातून पुसून टाकण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीमागे याच शस्त्रास्त्रांची ताकद आहे. अमेरिकेची ही यंत्रणा इराणचे लष्करी तळ आणि मिसाईल्स साइट्स काही मिनिटांत उद्ध्वस्त करू शकते. एवढेच नाही तर, इराणच्या एअर डिफेन्स सिस्टमला अमेरिकन विमाने रोखणे कठीण असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

हल्ल्याचा सामना करण्यासाठी सज्ज : इस्त्रायल
कुठल्याही संभाव्य हल्ल्याचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. अमेरिका आणि इराणच्या वाढत्या तणावात, दुसरीकडे, या वाढत्या तणावामुळे इस्रायलने हाय अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, इस्रायली होम फ्रंट प्रशिक्षित आणि सक्षम आहे आणि सैन्य हाय अलर्टवर आहे असे चीफ ऑफ स्टाफ यांनी म्हटले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR