सोलापूर – दावणगेरे येथे दि. २४ डिसेंबरला झालेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत म हासभेच्या २४व्या अधिवेशनातील काही ठरावांचा व भूमिकेचा वीरशैव लिंगायत समाज म हाराष्ट्रातील संघटनांनी निषेध केला आहे. वीरशैव लिंगायत हिंदूच असल्याची नोंद जनगणनेत करणार, असे या संघटनांनी म्हटले आहे. २४ डिसेंबरला झालेल्या अधिवेशनात अखिल भारतीय वीरशैव महासभेने आगामी जनगणने मध्ये धर्माच्या रकान्यात वीरशैव किंवा लिंगायत असे शब्द लिहावेत, हिंदु शब्द लिहू नये असे आवाहन केल्याचे कळते. वीरशैव लिंगायत समाजात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील संघटनांनी या ठरावाचा जाहीर तीव्र निषेध केला आहे. पाच जगद्गुरूंपैकी अनेकांनी अनेक ठिकाणी आपला धर्म हिंदू असल्याचे निक्षून सांगितले आहे.
पाचही जगद्गुरू किंवा संबंधित शिवाचार्य त्यांनी पूर्वी घेतलेल्या हिंदु असण्याच्या सद्सदविवेकी भूमिकेवरून सहजासहजी ढळतील असे वाटत नाही. म्हणूनच समाजहिताला व पर्यायाने राष्ट्र हिताला बाध आणणाऱ्या कांग्रेसच्या वळचणीला जावून बसलेल्या तथाकथित समाज नेतृत्वाचा भंडाफोड आमचे गुरुवर्य करतील अशी आशा बाळगणे गैर ठरणार नाही. हिंदु वीरशैव लिंगायत मंचच्या या पत्रकान्वये अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या हिंदु विरोधी ठरावाचा जाहीर धिक्कार करीत आहे. तसेच आगामी, जनगणनेत जनगणनेतील धर्माच्या रकान्यात हिंदू लिहिण्याचा आतापर्यंत वंशपरंपरागत रित्या चालत असलेला शिरस्ता पाळावा, अपप्रचार व अफवांपासून सावध राहून समाज वाचवावा असे आवाहन हिंदू वीरशैव लिंगायत मंच शहर सहसंयोजक विजय बिराजदार, मल्लिकार्जुन पाटील यांनी केले आहे.
यावेळी नीता स्वामी, गायत्री स्वामी, अश्विनी कल्लीमठ, ललिता हिरेमठ, शिवानंद सावळगी, सिद्धारुढ हिटनळी, दीपक गदगे, सिद्धाराम रामशेट्टी, चिदानंद म स्तारे, चनन्विर चिट्टे, राम शेट्टी सिद्धाराम राजेश नीला नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, श्रीमंत मेरू गंगाधर गवसने, प्रवीण दों पाटील, मल्लिनाथ हिरेमठ, शिवराज झुंजे सागर अतनुरे, उदय पाटील राहुल पावले, चेतन लिगाडे आदी उपस्थित होते.