36.8 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeमनोरंजनज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन

ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन

मुंबई : आपल्या आगळ्या वेगळ्या गायकीसाठी केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये ज्यांची ख्याती होती अशा पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

बॉलीवूडमध्ये गेल्या चार दशकांहून अधिक काळ पंकज उधास यांनी आपल्या गायकीने वेगळी ओळख तयार केली होती. दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली असून त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी पोस्ट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. ८० च्या दशकांत पंकज उधास यांनी त्यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तब्बल चार दशकांहून अधिक काळ ते संगीत विश्वात सक्रिय होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR