विजय लमकणे राज्यात पहिला

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने(एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला असून सोलापूरच्या विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावत इतिहास घडवला आहे. त्यांच्या या यशामुळे सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी रात्री उशिरा आयोगाने हा निकाल प्रसिद्ध केला.

एमपीएससीतर्फे २७ ते २९ मे २०२४ या कालावधीत राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आल्या. मुलाखती संपल्यानंतर रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. एकूण १,५१६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते.

या निकालात हिमालय घोरपडे यांनी दुसरा क्रमांक, तर नागपूरच्या प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, विजय लमकणे हे आधीच एमपीएससीच्या माध्यमातून विविध सेवांमध्ये निवड झालेले अधिकारी असून सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

महिलांची उल्लेखनीय कामगिरी
यंदाच्या राज्यसेवा परीक्षेत महिलांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुलींमधून आरती जाधव या राज्यात पहिल्या आल्या आहेत, तर अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून प्रगती जगताप यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. प्रगती जगताप सध्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या निकालात अनेक उमेदवारांनी आपले स्वप्न पूर्ण केले असून महाराष्ट्रभरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. विशेषत: सोलापूरच्या विजय लमकणे यांच्या राज्यात पहिल्या क्रमांकाच्या कामगिरीमुळे स्थानिकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या यशाने अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या तरुणांना प्रेरणा मिळाली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news