25.2 C
Latur
Tuesday, June 17, 2025
Homeक्रीडाविजय मल्ल्याला मुंबई इंडियन्स विकत घ्यायची होती

विजय मल्ल्याला मुंबई इंडियन्स विकत घ्यायची होती

बंगळूरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएलच्या १८ व्या हंगामात अखेर जेतेपद पटकावले. आरसीबीने पहिली वहिली ट्रॉफी उंचावल्यावर या संघाचा पहिला मालक विजय मल्या देखील चर्चेत आहे. हजारो कोटींची फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फरार असलेला उद्योजक विजय मल्ल्या याने आरसीबीच्या स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त केल्याचेही पाहायला मिळाले. त्यानंतर आता राज समानीच्या पॉडकास्ट शोमध्ये दिलेली त्याची मुलाखत चर्चेत आली. या मुलाखतीमध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ खरेदी करण्यामागची गोष्ट शेअर केली.

२००८ च्या पहिल्या हंगामात ८ संघांवर बोली लागली होती. विजय मल्ल्या हा त्यावेळी आरसीबीचा मालक झाला. पण त्याची पहिली पसंती हा बंगळुरुचा संघ मूळीच नव्हता. खुद्द मल्ल्याने याबाबत खुलासा केला आहे. पॉडकास्टमध्ये तो म्हणाला की, त्यावेळी मी तीन फ्रँचायझीवर बोली लावली होती. ज्यात मुंबई इंडियन्सचाही समावेश होता. पण ही टीम मुकेश अंबानींची झाली आणि शेवटी विजय मल्ल्या १२ मिलियन डॉलरसह आरसीबीचा मालक झाला होता.

हजारो कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेला विजय मल्ल्यानं राज समानी याला दिलेल्या मुलाखतीत आरसीबीचा मालक झाल्याची खास स्टोरी शेअर करताना मुंबई इंडियन्सवर लावलेला डाव फसल्याची गोष्ट सांगितली आहे. तो म्हणाला की, ललित मोदी यांनी बीसीसीआयला दिलेल्या या लीगच्या संकल्पनेमुळे प्रभावित झालो होतो. एक दिवस त्यांनी मला बोलवले आणि यापैकी एखादी टीम खरेदी करण्यास इच्छुक आहात का? असे विचारले. यावेळी मी तीन फ्रँचायझीसाठी बोली लावली. खूप कमी पैशासह मुंबई इंडियन्सवर लावलेली बोली हरलो. माल्या पुढे म्हणाला की, २००८ मध्ये आरसीबी फ्रँचायझीवर बोली लावली त्यावेळी आयपीएलला भारतीय क्रिकेटमधील गेम चेंजरच्या रुपात पाहिले. शेवटी ११२ मिलियन डॉलरच्या बोलीसह आरसीबी टीम खरेदी केली. त्यावेळीची ही दुस-या क्रमांकाची मोठी बोली होती.

ब्रँडचा प्रसार करण्याच्या हेतूनेच खरेदी
आरसीबी एक असा ब्रँड करायचा होता जो क्रिकेटच्या मैदानाच नाही तर मैदानाबाहेरही ओळखला जाईल. त्यामुळेच या संघाचे नाव सर्वाधिक खप असलेल्या मद्य ब्रँडशी कनेक्टेड केले. टीम खरेदी करण्यामागे क्रिकेट प्रेम वैगेरे अजिबात नव्हते. व्हिस्की ब्रँडच प्रमोशन हाच यामागचा हेतू होता असेही विजय मल्ल्याने स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR