कौशल्य विकासाच्या नावाखाली ४०० कोटींचा डल्ला!

नागपूर : प्रतिनिधी
राज्यातील १५ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योग विकास अभियानात तब्बल ४०० कोटी रुपयांचा महाघोटाळा झाला आहे. नागपूर आणि विदर्भात भाजपच्या एका बड्या पदाधिका-याच्या आशीर्वादाने हा घोटाळा सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी कौशल्य विकास विभागातील भ्रष्टाचार, एमपीएससीमधील कथित ‘सेटिंग’ व गैरव्यवहार, एससी-एसटी-ओबीसी-अल्पसंख्याक विचारमंथन शिबिर आणि प्रशांत भूषण यांच्या विधानावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
कौशल्य विकास विभागातील भ्रष्टाचाराची कागदपत्रे माध्यमांसमोर मांडत विजय वडेट्टीवार म्हणाले, १५ ते ४५ वयोगटातील तरुणांना कौशल्यवर्धन देऊन किमान ७५ टक्के उमेदवारांना प्रत्यक्ष नोकरी मिळवून देणे नियमानुसार बंधनकारक होते. मात्र नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा आदी जिल्ह्यांत ‘पुष्पांजली फाउंडेशन’ व इतर संस्थांनी प्रत्यक्षात कोणतेही प्रशिक्षण वर्ग चालवलेच नाहीत.

डिसेंबर २०२५ मध्ये अमरावती विभागाचे उपायुक्त दिलीप ठाकरे यांनी अचानक केंद्राची पाहणी केली असता तिथे एकही विद्यार्थी किंवा प्रशिक्षक आढळला नाही. त्यानंतर यवतमाळ उपायुक्तांच्या स्वतंत्र चौकशीतही प्रशिक्षण केंद्र बंद असल्याचे उघड झाले. ३६० हून अधिक बोगस उमेदवारांची नावे आणि ओळखपत्र माहिती कुठूनतरी जमा करून परस्पर अनुदान लाटण्यात आले.

एसओपी आणि नियमांचे उल्लंघन
या संस्था एमएसएसडीएसकडे सूचीबद्ध नव्हत्या. त्यांना कोणताही अधिकृत ट्रेनिंग बॅच नंबर नव्हता, विद्यार्थ्यांची दैनंदिन बायोमेट्रिक हजेरी नव्हती, आणि कोणालाही रोजगार दिला गेला नाही. तरीही २०१५-१६ पासून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर करून तब्बल ४०० कोटी रुपये हडप करण्यात आले. संपूर्ण राज्याची चौकशी केल्यास हा आकडा १ हजार कोटींवर जाईल.

एमपीएससीमध्ये पैसे मोजून सेटिंग
स्पर्धा परीक्षांच्या गोंधळावर आणि खाजगीकरणावर बोलताना त्यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा पुनरुच्चार केला. एमपीएससी व इतर सरळसेवा परीक्षांमध्ये प्रचंड अनागोंदी माजली आहे. नागपूरच्या एकाच केंद्रावरून ६२ पैकी २४ टॉपर कसे येतात? ज्या मुलांना इतर परीक्षांमध्ये दोन-चार गुण मिळतात, ती इथे थेट टॉपर होतात. सेंटर मॅनेज करून, पैसे घेऊन भरती केली जात आहे. यात केवळ अधिकारी बदलून चालणार नाही, तर संपूर्ण यंत्रणेचे शुद्धीकरण करावे लागेल.

जनतेच्या आंदोलनाला घाबरले
कॅगच्या अहवालानंतर यूपीए सरकारच्या काळात देशात वातावरण निर्माण करणारे भाजपवाले आता जनतेचा आक्रोश पाहून घाबरले आहेत. शांततेत, हातात तिरंगा घेऊन निशस्त्र आंदोलन करणा-या तरुणांवर दिल्लीत पोलीस लाठीमार करतात, दिल्लीला छावणीचे स्वरूप दिले जाते. जनता आता एकत्र येत असून सत्ता उलथवून लावेल, या भीतीपोटीच सत्ताधारी विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी शेवटी केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये पित्यानेच सात वर्षीय मुलाचा खून केल्याचा आरोप
03:41
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत खळबळ!कमलाकर शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप |अरविंद पाटलांचे नाव चर्चेत
02:38
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पटवारी डेंटल क्लिनिकचे उद्घाटन | खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे रुग्णसेवेचे आवाहन
01:53
Video thumbnail
Yedshi Fire Accident | Dharashiv News|येडशीत भीषण आग! एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू
02:01
Video thumbnail
Uday Samant|उदय सामंत यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा! | दुष्काळग्रस्तांना 2 हजार टँकर
07:10

Latest news