23.4 C
Latur
Tuesday, September 10, 2024
Homeक्रीडाविनेश फोगटने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत

विनेश फोगटने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत

उपांत्य फेरीत ५-० ने दणदणीत विजय

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पैलवान विनेश फोगट आणि क्यूबाची पैलवान युस्रेलिस गुझमान यांच्यात उपांत्य फेरीची लढत पार पडली. ५० किलो महिला फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात विनेश फोगटने उपांत्य फेरीत धडक दिली होती. उपांत्य फेरीत विनेश फोगटची लढत क्यूबाची पैलवान वाय. गुझमन हिच्यासोबत होणार आहे. उपांत्य फेरीत विनेश फोगटने वाय. गुझमान हिला ५-० असे पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारणारी विनेश पहिली भारतीय पैलवान ठरली आहे.

विनेश फोगटने सुरुवातीपासून आक्रमकपणे खेळ सुरु केला होता. वाय. गुझमान बचावात्मक खेळ करत होती. त्यामुळे तिला ३० सेकंदांचा वेळ देण्यात आला होता. त्यात देखील ती गुण मिळवू शकली नाही, त्यामुळे विनेश फोगटला पहिला गुण मिळाला. मॅचच्या पूर्वार्धात विनेश फोगट १-० ने आघाडीवर होती. मॅचच्या दुस-या टप्प्यात क्यूबाच्या वाय. गुझमानने पलटवार करण्याचा प्रयत्न केला. दुस-या टप्प्यात विनेश फोगटला ३० सेकंदांचा वेळ गुण घेण्यासाठी देण्यात आला. यामध्ये विनेश फोगटने २ गुण घेत आघाडी ३-० अशी केली. पुन्हा २ गुण मिळवत विनेशने आघाडी ५-० अशी केली.

भारताची पैलवान विनेश फोगट हिने दोन मॅच जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विनेश फोगट भारताकडून ५० किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात खेळते. यूक्रेनच्या ओकासाना लिवाच हिचा ७-५ पराभव करत विनेश फोगटने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी विनेश फोगटमध्ये समोर जपानच्या यूई सुसाकीचे आव्हान होते. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकाही सामन्यात पराभूत न झालेल्या युई सुसाकीला विनेश फोगटने पराभूत केले.

यूक्रेनची ओकासाना लिवाच हिचा ७-५ पराभव करत विनेश फोगटने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. विनेश फोगटने जपानच्या दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणा-या आणि वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकीचा ३-२ असा पराभव केला. विनेश फोगटने युई सुसाकीला पराभूत करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठा उलटफेर केला आहे. दरम्यान, विनेश फोगट यापूर्वी ५३ किलो वजनी गटातून कुस्ती खेळत होती. यावेळी ती ५० किलो वजनी गटातून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR