21.9 C
Latur
Wednesday, November 6, 2024
Homeक्रीडाविराट कोहली अनुष्कासोबत भजनात दंग

विराट कोहली अनुष्कासोबत भजनात दंग

मुंबई : प्रतिनिधी
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी खूपच लोकप्रिय असून ते स्टार कपलपैकी एक आहेत. त्यांचा एक नवा व्हीडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये विराट-अनुष्का भजन-कीर्तनात दंग झाल्याचे दिसत आहेत.

दरम्यान, भारत वि. न्यूझिलंड यांच्यात सध्या ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू असून पहिला सामना जिंकून न्यूझिलंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. संघ हरल्यानंतर विराट आपल्या कुटुंबियांसोबत भजनामध्ये दंग झाल्याचे दिसले. २० ऑक्टोबर रोजी करवा चौथच्या दिवशीच विराट-अनुष्का मुंबईत स्पॉट झाले. मात्र यावेळी ते नेस्को येथे कृष्णा दास यांच्या कीर्तनासाठी आले होते.

पहिल्या रांगेत बसलेले विराट-अनुष्का भजनात अतिशय दंग झालेले दिसले. त्यांचाच एक व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या वेळी अनुष्का पांढ-या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. टाळ्या वाजवत, हसतमुखाने बसलेली अनुष्का कीर्तनाचा आनंद घेत तल्लीन झाली होती. तर तिच्या शेजारीच शांतपणे डोळे मिटून बसलेला विराट जप करण्यात मग्न होता. यापूर्वी ते परदेशात असताना, लंडनमध्येही अशा अनेक कार्यक्रमांत सहभागी झाले.

पुण्यात होणार दुसरा सामना
टीम इंडिया विरुद्ध न्यूझिलंड यांच्यातील उर्वरित दोन्ही सामने हे महाराष्ट्रात होणार आहेत. दुसरा कसोटी सामना हा २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा मुंबईत होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR