24.3 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्र‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणत मतदान करा

‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणत मतदान करा

- उद्धव ठाकरेंचे जनतेला आवाहन - निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मध्य प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. तसेच, एकीकडे भाजपला फ्री हीट द्यायची आणि आमची विकेट घ्यायची हे बरोबर नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी खास शैलीत निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले आहेत.

उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, काल दिवाळी दणक्यात साजरी झाली आणि गोड झाली. टीम इंडिया चांगली खेळली. विराटचे अभिनंदन. आमच्या पिढीने सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर विराट कोहली हे तीन दिग्गज एकत्र पाहिले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, एकीकडे वर्ल्डकप, दुसरीकडे निवडणूक सुरू आहे. निवडणूक आयोगाला आम्ही एक पत्र लिहिले आहे. काही शंका-कुशंका आहेत. भाजपला फ्री हीट द्यायची आणि आमची विकेट घ्यायची हे बरोबर नाही. १९९५ ला आमचे सरकार राज्यात असताना हिंदुत्वाचा प्रचार केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या काही आमदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता.

भाजप कर्नाटकमध्ये बजरंग बली की जय म्हणत मतदान करा म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीत आता अयोध्येला खर्च येणार नाही, असे म्हणतायत. भाजपकडून मोफत अयोध्या वारी घडवण्याची घोषणा करण्यात आली. २२ जानेवारीला अयोध्येतील राममंदिर सुरू होईल, उद्घाटन होणार आहे. ५ कोटी लोक तिथे भाजपवाले आणतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR