अहमदनगर : लोकसभा निवडणूकीसाठी चौथ्या टप्प्यात राज्यातील ११ लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी नगरमध्ये मतदारांना पैसे वाटल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओही शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी व त्यांच्या पक्षाने सोशल मीडियावर शेयर केला असून, या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
भाजप सत्तेच्या जोरावर पैसे वाटप करून मतदान आणि निवडणूक प्रभावित करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला आहे. दरम्यान अशाच प्रकार बारामती मतदारसंघातही घडला होता.त्याचप्रमाणे अहमदनगरमध्ये रात्री भाजपने पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना पारनेर तालुक्यात घडली असून, भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे हे पैसे वाटतानाच व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाईची करण्यात यावी अशी मागणी अहदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केली आहे. अहमदनगरमध्ये भाजपने सुजय बिखे पाटील तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके निवडणूक लढवत आहेत.