23.8 C
Latur
Wednesday, March 11, 2026
Homeराष्ट्रीयस्पेशल ऑडिटमधून ‘व्हीआरएस’ला वगळले

स्पेशल ऑडिटमधून ‘व्हीआरएस’ला वगळले

अजित पवारांचा बळी घेणा-या विमान कंपनीचा बचाव? डीजीसीएचा धक्कादायक निर्णय

नवी दिल्ली : अजित पवार यांचा चार्टर विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) देशातील चार्टर कंपन्यांच्या विमानाचे स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला असून मात्र यातून व्हीआरएस व्हेंचर या विमान कंपनीला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण याच कंपनीच्या विमानाचा अपघात होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बळी गेला आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रमुख १४ कंपन्यांचे स्पेशल ऑडिट करण्यात येणार आहे. मात्र, त्यात अजित पवारांच्या विमान अपघातास कारणीभूत कंपनीचा समावेश नाही. या तपासणीत विमानाची देखभाल कशी आहे, इंजिन व अन्य तांत्रिक गोष्टी कशा पद्धतीने जोपासण्याला आहेत, नियमित तांत्रिक तपासणी होते का, आदी मुद्यांवर भर देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ज्या कंपन्यांची तपासणी होणार आहे, त्यामध्ये एअर चार्टर सर्व्हिसेस प्रा. लि., ए. आर. एअरवेज प्रा. लि., एरो एअरक्राफ्ट सेल्स अँड चार्टर, चिप्सन एव्हिएशन प्रा. लि. डेक्कन चार्टर प्रा. लि., ग्लोबल व्हेक्ट्रा हेलिकॉर्प लि., इन्डो – पॅसिफीक एव्हिएशन प्रा. लि., इंडिया फ्लाय सेफ एव्हिएशन लि., कर्णावती एव्हिएशन प्रा. लि., पवन हंस लि., राजस एरोस्पोटर्स प्रा. लि., रेडबर्ड एअरवेज प्रा. लि., रिलायन्स कमर्शिय डिलर्स लि., झेस्ट एव्हिएशन लि. या कंपन्यांचा समावेश आहे.

विशेष पथकाचा समावेश
धक्कादायक गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्यात ज्या १४ कंपन्यांची तपासणी होणार आहे, त्यात अजित पवार यांच्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या विमानाच्या व्हीआरएस व्हेन्चर कंपनीचा समावेश नाही. या विशेष ऑडिटकरिता डीजीसीएने विशेष पथक स्थापन केले असून, येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत या कंपन्यांसंदर्भातील अहवाल देण्याचे आदेश या विशेष पथकाला देण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR