25.7 C
Latur
Saturday, June 14, 2025
Homeमनोरंजन‘फायटर’चे थरारक ट्रेलर बघाच

‘फायटर’चे थरारक ट्रेलर बघाच

मुंबई : ‘फायटर’ सिनेमाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. ‘फायटर’चे पोस्टर, टीझरपासूनच सिनेमाची चर्चा आहे. हृतिक रोशनचा तडफदार अंदाज. याशिवाय अनिल कपूर, दीपिका पदुकोण यांच्याही एअर फोर्स लूकवर सर्वांनी पसंती दिली आहे. अशातच आज ‘फायटर’चे ट्रेलर रिलीज झाले आहे. ‘फायटर’च्या ट्रेलरमधून वायुसेनेचा थरार बघायला मिळत आहे.

‘फायटर’च्या ट्रेलरमध्ये हृतिक रोशन, अनिल कपूर, दीपिका पदुकोण यांचा तडफदार अंदाज बघायला मिळत आहे. परक्या देशांतून आक्रमणाचा बचाव करण्यासाठी वायुसेनेचे अधिकारी सज्ज आहेत. चित्रपटात तीन मुख्य कलाकारांसोबतच करण सिंग ग्रोव्हर, शोभिता धुलिपाला आणि अक्षय ओबेरॉय सुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत.

‘फायटर’ बद्दल बोलायचे तर हा बॉलिवूडच्या एरियल अ‍ॅक्शन फ्रँचायझीचा पहिला चित्रपट आहे. फायटर सुरुवातीला सप्टेंबर २०२२ मध्ये रिलीज होणार होता, परंतु प्री-प्रॉडक्शनमध्ये चित्रपटाला उशीर झाल्याने चित्रपटाची रिलीजची डेट पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी चित्रपटामधील ‘शेर खुल गए’, ‘इश्क जैसा कुछ’ ही दोन गाणी भेटीला आली

हा सिनेमा २५ जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. ‘पठाण’ सिनेमा २०२३ ला प्रजासत्ताक दिनाला रिलीज झाला होता. ‘पठाण’ने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR