पश्चिम बंगाल सरकारकडून राज्यातील २५२ मदरशे बंद

कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील २५२ मदरशांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सुमारे १०० इतर मदरशांना कारण दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, तपासणीत या मदरशांकडे मूलभूत सुविधा आढळल्या नाहीत. ही कारवाई अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागाने केली आहे.

सरकारने रविवारी हे देखील सांगितले की, मानके पूर्ण करणारे मदरसे सुरू राहतील. ज्या संस्थांना नोटिसा दिल्या आहेत, त्यांच्या उत्तराची तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. यापूर्वी २०२६ च्या अर्थसंकल्पात बंगाल सरकारने अल्पसंख्याक कल्याण आणि मदरसा विभागासाठीचा निधी ५,७१३ कोटींवरून २,१६५.४२ कोटींपर्यंत कमी केला होता. म्हणजेच, अर्थसंकल्पात सुमारे ३६०० कोटींची कपात झाली होती.

अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने जूनच्या सुरुवातीपासून पश्चिम बंगालमधील सर्व जिल्ह्यांमध्ये जमिनीवरील सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये सरकारी आणि खासगी मदरशांच्या मूलभूत सुविधा, मंजुरीची स्थिती आणि व्यवस्थापन व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. अधिका-यांनी सांगितले की, संबंधित मदरशांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या उत्तरांची तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ही चौकशी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील अधिकृत आणि अनधिकृत मदरशांची माहिती मिळवण्यासाठी केली होती.

बंगालमधील सर्व मदरशांमध्ये वंदे मातरम गाणे अनिवार्य
पश्चिम बंगाल सरकारने राज्याच्या अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागांतर्गत येणा-या सर्व मदरशांमध्ये वंदे मातरम गाणे अनिवार्य केले आहे. १९ मे रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, हा नियम सरकारी मॉडेल मदरसे, सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांना तात्काळ लागू होईल. यापूर्वी मदरशांमध्ये सकाळच्या प्रार्थनेदरम्यान राष्ट्रगीत जन गण मन आणि कवी गुलाम मुस्तफा यांचे ‘अनंत असीम प्रेममय तुमी (बंगाली गीत) गायले जात असे. आता सर्व मदरशांना हा आदेश लागू केल्यानंतर त्याचा अहवाल विभागाला सादर करावा लागेल.

यूपी आणि आसाम सरकारनेही चौकशी केली
उत्तरप्रदेश सरकारनेही सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत गैर-मान्यताप्राप्त मदरशांच्या निधी आणि सुविधांच्या तपासणीसाठी मोठे सर्वेक्षण केले होते. त्याचबरोबर, पारदर्शकता आणण्यासाठी मदरसा पोर्टल सुरू केले आणि अभ्यासक्रमात एनसीईआरटीची पुस्तके, संगणक, गणित व इंग्रजी यांसारखे आधुनिक विषय अनिवार्य केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Farmer Sucide|दुष्काळ अन् कर्जाचा ताण; निलंग्यात ४१ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
01:41
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये दुर्गामातेच्या आगमनाची धूम! आदिवासी नृत्याने वेधले सर्वांचे लक्ष
02:56
Video thumbnail
Latur|उदगीरच्या सोमनाथपूरमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
01:34
Video thumbnail
Nanded|माहूर गडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात!
03:36
Video thumbnail
Latur|लातुरात बेशिस्त ऑटोचालकांवर वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा!
01:18
Video thumbnail
गतवर्षी अति पावसामुळे कापसाच्या वाती तर यावर्षी वाती साठी देखील कापूस नाही
02:01
Video thumbnail
Latur|अवैध सावकारीला लगाम घालण्यासाठी लातूर पोलिसांचे मोठे पाऊल!
03:48
Video thumbnail
Latur|१२ ऑक्टोबरला प्राध्यापकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन
06:43
Video thumbnail
Latur|विहिरीत मुबलक पाणी, पण नळ कोरडेच! जलजीवन योजनेचा उदगीरमध्ये बोजवारा?
04:19
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43

Latest news