Homeमहाराष्ट्रबाजारात गव्हाचे दर घसरले!

बाजारात गव्हाचे दर घसरले!

आखाती युद्धाचा परिणाम; क्विंटलमागे ६०० रुपयांचा बसतो फटका

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
आखाती देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम विदर्भातील शेतीमालाच्या दरांवर होत आहे.

आखाती देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम विदर्भातील शेतीमालाच्या दरांवर होत आहे. विशेषत: यवतमाळ जिल्हा येथे रब्बी हंगामातील गव्हाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

दरवर्षी प्रतिक्विंटल २८०० ते ३२०० रुपये दर मिळणा-या गव्हाला यंदा २,१०० ते २,२०० रुपये दर मिळत असून सुमारे ६०० रुपयांचा फटका बसत आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ साठी २३२५ रुपये हमीभाव जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात तोही मिळत नसल्याची तक्रार शेतक-यांकडून होत आहे. यावर्षी पुरेशी थंडी, पोषक वातावरणात रब्बी गहू पिकाचे चांगले उत्पादन झाले. काहींना तर एकरी १२ ते १५ क्विंटल याप्रमाणे गव्हाचे उत्पादन झाले. त्यामुळे शेतकरी आनंदात असताना बाजारपेठेतील गव्हाच्या दरात मोठी घसरण झाली. उत्पादन खर्च निघणार किंवा नाही, यामुळे गहू उत्पादक शेतकरी हताश झाले.

यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश भागात खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन ही नगदी पिके घेतली जातात, तर रब्बीमध्ये गहू व हरभरा पिकवले जाते. मात्र यंदा खरीप हंगामातच अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादन घटले. त्यानंतर काही भागात झालेल्या गारपिटीनेही शेतक-यांचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे आधीच नुकसान आर्थिक अडचणीत आता गव्हाच्या घसरलेल्या दराचा दुहेरी फटका बसत आहे. एकरी खर्चाचा हिशोब पाहता आता शेतक-यांच्या हाती काही ठरते की नाही हाच मोठा विषय आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR