नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार महुआ मोइत्रा पुन्हा एकदा एका वादामुळे चर्चेत आल्या आहेत. एका विमान प्रवासादरम्यान सहप्रवाशांनी त्यांना पाहून ‘चोर-चोर’ अशा घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महुआ मोइत्रा विमानात चढत असताना किंवा आपल्या जागेवर जात असताना काही प्रवाशांनी त्यांना लक्ष्य केले. ‘कॅश फॉर क्वेरी’ (प्रश्नांसाठी पैसे घेणे) प्रकरणात झालेल्या आरोपांचा संदर्भ देत प्रवाशांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.या घोषणाबाजीमुळे महुआ मोइत्रा यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी घोषणा देणाऱ्या प्रवाशांना ‘बदतमजी’ (असंस्कृतपणा) करू नका असे सुनावले. या गोंधळामुळे विमानात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
This is BJP culture. Why is anyone surprised? I ignored it & went to my mtng from airport. Then people forwarded me video which the Sanghis were “viralling”. That’s when I called it out. @IndiGo6E tells me they need a formal complaint. Which I am sending. pic.twitter.com/muAQxu7vPh
— Mahua Moitra (@MahuaMoitra) May 7, 2026
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक प्रवाशांच्या या वागणुकीचे समर्थन करत आहेत, तर काही जण लोकप्रतिनिधीसोबत असे वागणे चुकीचे असल्याचे म्हणत आहेत.

