अस्तीनातील साप कोण? भाजपलाही जाब विचारणार

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या वादामध्ये नेमके पैसे कुणी घेतले आणि कुणी आणले याबाबत चर्चा सुरू असून, ऑडिओ क्लिपमधील आवाजावरून वाद सुरू झाला आहे. आम्ही यापूर्वीच या प्रकरणाची फॉरेन्सिक चौकशी करण्याची मागणी केली असून, हा आवाज नेमका कुणाचा आहे हे सर्वजण जाणून आहेत, असं संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

५०० कोटींच्या प्रकरणातील व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपबद्दल बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, एवढी खासगी टेप बाहेर येतेच कशी आणि ती बाहेर आणणारे नेमके कोण आहेत? आतापर्यंत ज्यांच्या आवाजाबाबत चर्चा आहे त्यांनी हा आमचा आवाज नाही असा दावा केलेला नाही, त्यामुळे आम्हालाही यावर संशय आहे. महायुतीमध्ये भांडण लावणारे आणि कटकारस्थान रचणारे ‘अस्तीनातले साप’ नेमके कोण आहेत, हे समोर आले पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊ द्या, त्यानंतर ज्याचे नाव समोर येईल त्याला आणि गरज पडल्यास भाजपला देखील जाब विचारणार आहोत. मात्र, यातून आम्ही एकमेकांचे कपडे फाडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दादरमध्ये फुगड्या घाला, नाचायला कमी पडल्यास मुसाला बोलवा
या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना संजय शिरसाट म्हणाले की, महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. मात्र, दुस-याचे घर जळत असल्याचे पाहून संजय राऊतांना आनंद होतो. त्यांना इतकाच आनंद झाला असेल तर त्यांनी दादरमध्ये येऊन पेढे वाटावे आणि फुगड्या घालाव्यात. जर नाचायला माणसे कमी पडत असतील तर त्यांनी मुसाला बोलवावे, अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला.

राजकीय घडामोडींवर रोखठोक भाष्य
प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत बसल्यास राजकारणात कुणीही कमी नाही, प्रत्येकाला टोकाचे बोलता येते; मात्र आता हे थांबवले पाहिजे कारण सर्वसामान्य लोकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी आपली भूमिका मांडली असून पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी त्याची दखल घेतली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news