22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeअंतरराष्ट्रीयवर्षातील सर्वात मोठा दिवस २१ जून का असतो?

वर्षातील सर्वात मोठा दिवस २१ जून का असतो?

नवी दिल्ली : दरवर्षी २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. ही एक खगोलीय घटना आहे, मात्र जगभरातील अनेक संस्कृती आणि धर्मांमध्ये याला खास महत्व आहे. २१ जून हा दिवस सर्वात मोठा का असतो आणि त्यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे काय आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.

वैज्ञानिक कारण
२१ जून हा सर्वात मोठा दिवस असण्याचे वैज्ञानिककारण म्हणजे पृथ्वी ही तिच्या अक्षाकडे सुमारे २३.५ अंशांवर झुकलेली आहे. पृथ्वीचा हा कल ऋतू बदलण्याचे मुख्य कारण आहे. जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती कक्षेत फिरते तेव्हा २१ जूनला उत्तर गोलार्ध सूर्याकडे सर्वात जास्त झुकलेला असतो. यादिवशी सूर्याची किरणे थेट उत्तर गोलार्धात असलेल्या कर्क रेषेवर पडतात.
२१ जून रोजी सूर्याची किरणे थेट उत्तर गोलार्धावर पडतात, त्यामुळे या दिवशी सूर्यप्रकाश जास्त काळ टिकतो आणि रात्र लहान असते. म्हणूनच २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आणि दक्षिण गोलार्धातील सर्वात लहान दिवस असतो.

धार्मिक कारण
२१ जूनला काही भागांमध्ये ग्रीष्म संक्रांत साजरी केली जाते. जगभरातील विविध संस्कृतींमध्ये हा दिवस पीक काढणी आणि नवीन सुरुवातीशी जोडला गेला आहे. इजिप्शियन, मायान आणि नवपाषाण संस्कृतींमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे. ही खगोलीय घटना अधोरिखीत करण्यासाठी स्टोनहेंज सारखी अनेक प्राचीन स्मारके बांधण्यात आलेली आहेत. या ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्ताची स्थिती अभ्यासली जात असे. काही संस्कृतींमध्ये हा दिवस नृत्य करुन आणि गोडधोड मेजवानीसह साजरा केला जातो.

योग दिन
२१ जून हा दिवस हिंदू धर्मातही महत्वाचा आहे. पौराणिक मान्यतेनुसार भगवान शंकर यांनी आदियोगी (पहिला योगी) म्हणून या दिवशी ज्ञानाचा प्रसार केला होता. तसेच हा दिन योग दिन म्हणून देखील साजरा केला जातो. हा दिवस योगाभ्यासासाठी खूप शुभ मानला जातो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR