27.1 C
Latur
Monday, December 8, 2025
Homeमहाराष्ट्रकंपनीत ९९ टक्के शेअर असलेल्या पार्थ पवारला सूट का?

कंपनीत ९९ टक्के शेअर असलेल्या पार्थ पवारला सूट का?

१ टक्का शेअर असलेल्या पार्टनरवर गुन्हा सत्ताधा-यांचा अजब न्याय

पुणे : अमेडिया कंपनीत पार्थ पवारांचे ९९ टक्के शेअर्स असून केवळ १ टक्के शेअर असणारे त्यांचे पार्टनर दिग्विजय पाटील यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला. याचा अर्थ पार्थ पवारला वाचविण्यात येत आहे असा होतो तर पार्थला सूट का देण्यात येत आहे असा सवाल सर्वसामान्यांतून उभा राहत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुण्यातील जमीन खरेदीच प्रकरण गाजत आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांचे नाव आले आहे. पुण्यातील ही मोक्याची जाग पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला ३०० कोटी रुपयात कशी मिळाली? हा मुख्य प्रश्न आहे. बाजारभावानुसार या जमिनीचे मूल्य १८०० कोटी रुपये आहे. या जमिनीच्या खरेदी व्यवहारात मुद्रांक शुल्क म्हणजे स्टँप ड्युटी म्हणून ५०० रुपये भरले असा आरोप केला जात आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र अडचणीत आलेल्या जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल झाला. मात्र, पार्थ पवार यांच्याविरोधात अजून गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे पार्थ पवार यांना क्लीनचीट दिली जातेय का? असा प्रश्न विचारला जात आहे.

या जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारुंवर गुन्हा दाखल झाला आहे. पार्थ पवार कंपनीचे भागीदार आहेत. पण त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल झालेला नाही. अमेडिया कंपनीत दिग्विजय पाटील हे पार्थ पवार यांचे भागीदार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या नावावर १ टक्के शेअर्स असल्याचे बोलले जात. दिग्विजय पाटलांवर गुन्हा पण पार्थ पवारांवर नाही म्हणून शंका निर्माण झाली.

जागेची ‘पावर ऑफ अ‍ॅटर्नी’ कोणाकडे होती?
शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारु तिघांवर मुद्रांक शुल्कात फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रकरणात सहभाग असतानाही प्रशासनाकडून पार्थ पवारांविरोधात तक्रार का नाही?. कंपनीने ६ कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही अशी पोलिसांची माहिती आहे. शीतल तेजवानी यांच्याकडे संबंधित जागेची पावर ऑफ अ‍ॅटर्नी आहे. जमीन खरेदीखत शीतल तेजवानीने लिहून दिले. अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांनी ते लिहून घेतले. उपनिबंधक रवींद्र तारु यांनी कागदपत्र तयार करुन दिली.

तक्रारीत पार्थ पवार यांचे नाव का नाही?
दस्त नोदंणी अधिका-यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. पार्थ पवारांच्या चौकशीनतंर सगळया गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. तक्रारीत पार्थ पवार यांचे नाव का नाही? त्यावर अधिका-याने सांगितले की, आमच्या दस्तावर ज्या पार्टी आहेत, ज्यांची नावे टाकून सह्या आहेत, त्यांच्याविरुद्ध तक्रार केली.

शितलचा शोध घेण्याचे आव्हान
शीतल तेजवानीचा आता बावधन पोलिसांकडून शोध सुरु आहे. शीतलने जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कुलमुखत्यार पत्रासाठी जो पत्ता वापरला, त्या परामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळे आहे. त्यामुळे बावधन पोलिसांसमोर शितलचा शोध घेण्याचे आव्हान असेल. शीतलच्या अटकेनंतर पार्थ पवारांचा या प्रकरणातील रोल समोर येऊ शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR