फॉर्म ६ भरण्याचा पुन्हा अट्टाहास का?

नवी दिल्ली : मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला जोरदार फटकारले आहे. आधीपासून नोंदणीकृत मतदारांना पुन्हा फॉर्म ६ भरण्याचा अट्टहास का, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी प्रक्रियेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. २०२६ च्या प्रारुप मतदार यादीत ज्या नागरिकांची नावे आधीपासूनच नोंदवलेली आहेत, त्यांना नव्याने पहिल्यांदाच मतदान करणा-यांसाठी असणारा फॉर्म ६ भरण्यास का सांगितले जात आहे? असा सवाल उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहे.

दिल्लीतील मतदार याद्यांच्या पडताळणीदरम्यान सुमारे ४३ लाख मतदारांची नावे स्थलांतरित किंवा अनुपस्थित म्हणून प्रारुप यादीतून वगळण्यात आली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की फॉर्म ६ हा केवळ नवीन (पहिल्यांदाच मतदान करणा-या) मतदारांसाठी असतो. मग जे नागरिक आधीपासूनच नोंदणीकृत मतदार आहेत, त्यांना पुन्हा हाच फॉर्म भरण्याचा अट्टहास का केला जात आहे?

निवडणूक आयोगाची नमती भूमिका
सर्वोच्च न्यायालयाच्या कडक पवित्र्यानंतर निवडणूक आयोगाने आपली भूमिका बदलण्याचे संकेत दिले आहेत. उशिरा येणारे अर्ज स्वीकारण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन आयोगाने न्यायालयाला दिले. मतदार यादीतील दुरुस्ती आणि अर्जांसाठी असलेली ३० ऑक्टोबर ही सध्याची अंतिम मुदत गरजेनुसार वाढवली जाऊ शकते, असे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण मुद्यावर सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. या निर्णयामुळे दिल्लीतील लाखो मतदारांना मोठा दिलासा मिळाला असून मतदार यादीत नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी आवश्यक ती मुदतवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news