Homeनांदेडपत्नीचा खून; नांदेड जिल्ह्यातील सहावा खून

पत्नीचा खून; नांदेड जिल्ह्यातील सहावा खून

साडीच्या पदराने गळा आवळला मुखेड तालुक्यातील कर्णा येथील घटना आरोपी पतीस अटक

मुखेड : प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मौजे कर्णा येथे एका विवाहितेचा पतीनेच साडीच्या पदराने गळा आवळुन खून केल्याची घटना दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात आरोपी पत्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीस पोलिसांनी अटक केले आहे.

मुखेड तालुक्यातील मौजे कर्णा येथील आरोपी मारुती रामकिशन उर्फ बाबुराव खांडेकर याने आपल्या राहत्या घरी बेडरूममध्ये मयत पत्नी स्वाती मारुती खांडेकर हिच्यासोबत भांडण करुन मयत विवाहितेच्या अंगावरील साडीच्या पदराने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना मौजे कर्णा येथे दि. ६ एप्रिल रोजी सकाळी घडल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मुखेड पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जावेद शेख, पोलिस उपनिरिक्षक गणेश माने, पोलिस उपनिरिक्षक संदीप यामावार, पोलिस उपनिरिक्षक अभिजित तुतूरवाड सह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्ळाची पहाणी केली आणी घटनेचे गांभीर्य पाहुन फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले आणी त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करुन मयत महिलेस शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालय मुखेड येथे दाखल करुन त्याठिकाणी डॉक्टरांनी शवविच्छेदन केले.

याप्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ फिर्यादी योगेश गणपत देवकत्ते यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन आरोपी पती मारुती रामकिशन उर्फ बाबुराव खांडेकर वय ३५ वर्ष याच्याविरुद्ध मुखेड पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७७/२०२६ कलम १०३ (१) भारतीय न्याय सहिंतानुसार दि. ६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुखेड पोलिसांनी आरोपी पतीस अटक केले आहे. सदर घटनेचा तपास पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिजित तुतूरवाड हे करीत आहेत. मयताच्या पश्चात तिन मुले आहेत.या दुदैर्वी घटनेमुळे देवकत्ते परिवारावर दुखाचे डोंगर कोसळले असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR