23.6 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeराष्ट्रीयमंत्रालयाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार : संजय सिंह

मंत्रालयाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार : संजय सिंह

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाने १५ वर्षांखालील आणि २० वर्षांखालील राष्ट्रीय चॅम्पियनशिपची घोषणा करताना अटींचे उल्लंघन केल्याचे सांगत क्रीडा मंत्रालयाने नवनिर्वाचित कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांना निलंबित केले. आता याबाबत भारतीय कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांनी गुरुवारी माध्यमांना सांगितले की, राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे निलंबन करताना क्रीडा मंत्रालयाने योग्य प्रक्रिया पाळली नाही आणि ते मंत्रालयाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात आव्हान देणार आहेत.

ते म्हणाले की, सरकार डब्लूएफआयच्या स्वायत्त आणि लोकशाही पद्धतीने निवडलेल्या संस्थेची भूमिका ऐकल्याशिवाय निलंबित करू शकत नाही. आम्ही डब्लूएफआयच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने जिंकल्या. जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश रिटर्निंग अधिकारी होते आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचे (युडब्लूडब्लू ) निरीक्षक देखील होते. २२ राज्यांनी निवडणुकीत भाग घेतला, ४७ मते मिळाली, त्यापैकी मला ४० मिळाली, असे ते म्हणाले.

असे असूनही आम्हाला निलंबित केले तर ते आम्ही स्वीकारणार नाही. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संस्थेला आपली भूमिका मांडण्याची संधी दिली गेली नाही, जी न्यायाच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला याचा अधिकार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR