मोदींच्या आवाहनानंतर पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचे आणि कोरोनाकाळासारखी खबरदारी घेण्याचे आवाहन केल्याने देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लवकरच वाढ होईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिका आणि इस्राइलने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती अद्याप निवळलेली नाही. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आखातातून होणा-या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याला मोठा फटका बसला आहे. तसेच त्याची झळ आता भारताला बसू लागली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचे आणि कोरोनाकाळासारखी खबरदारी घेण्याचे आवाहन केल्याने देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लवकरच वाढ होईल,अशी शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मोदी यांनी दिलेला सल्ला मानणं का आवश्यक आहे, तसेच पेट्रोल, डिझेलचे दर न वाढल्याने पेट्रोलियम कंपन्यांना किती तोटा होत आहे याचे गणित मांडले आहे. त्यामुळे आता देशात पेट्रोल डिझेलचे दर किती वाढू शकतात, याबाबत अंदाज बांधले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, आंततराष्ट्रीय बाजारामध्ये खनिज तेल, गॅस आणि एलपीजीच्या किमती गगनाला भिडत आहेत. तेल कंपन्या महागड्या दराने कच्च्या मालाची खरेदी करत आहेत. मात्र सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ बसू नये म्हणून,पेट्रोल, डिझेल आणि गॅस जुन्या आणि कमी दरांमध्ये विकत आहेत. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना दररोज एक हजार रुपयांचा तोटा होत आहे. चालू तिमाहीमध्ये कंपन्यांचा एकूण तोटा हा १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

पेट्रोलियम मंर्त्यांनी मांडलेल्या गणितानंतर देशात पेट्रोल डिझेलच्या किमती किती वाढू शकतात, याबाबत अंदाज बांधले जात आहेत. सध्या तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर १८ रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर २५ रुपये एवढा तोटा होत आहे. त्यामुळे जर सरकारने पेट्रोलची किंमत १८ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलची किंमत २५ रुपये प्रतिलिटर एवढी वाढवली तर बीपीसीएल आणि एचपीसीएलसारख्या कंपन्यांचा तोटा शुन्यावर येऊ शकतो.
दरम्यान, आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये १० रुपयांनी कपात केली होती. त्यामुळे केंद्र सरकारला महसुलामध्ये दरमहा १४ हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर बिघडलेल्या परिस्थितीमुळे ही कपातही तेल कंपन्यांचा तोटा कमी करण्यास अपुरी पडली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24
Video thumbnail
Nanded|तुकाराम मुंढे नांदेडला? शहरातील गुटखा विक्रेत्यांची धावपळ
00:32
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अण्णाभाऊ साठे कुटुंब मैदानात;आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाची तयारी
04:08
Video thumbnail
Latur|फडणवीस सरकारची कर्जमाफी फसवी? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआरची होळी
04:04
Video thumbnail
Latur|लातूर मध्ये अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्षारोपण व फळवाटप
02:28
Video thumbnail
Latur|एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; लातुरात घंटानाद आंदोलन
02:44
Video thumbnail
Latur|पानपट्टी धारकांनी घेतला तुकाराम मुंडेंचा धसका; निम्म्याहून अधिक पानपट्ट्या
02:23
Video thumbnail
Latur|गुलाबपुष्प आणि लाडू देऊन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत;यशवंत विद्यालयाचा अनोखा स्वागत सोहळा
01:14
Video thumbnail
Latur|बैलगाडीतून शाळेत एन्ट्री! विद्यार्थ्यांचे नववधूप्रमाणे स्वागत
02:19
Video thumbnail
Latur|१० वर्षांचा अरविंद धावला १६ किलोमीटर; शिक्षणासाठी जिद्दीची अनोखी धाव
05:47
Video thumbnail
Pandharapur Accident News|दर्शनाहून परतताना मृत्यू! पिकअप पाण्यात कोसळली;८ भाविकांचा अंत
02:31

Latest news