मुंबई : संजय दत्तच्या करिअरमधील सर्वात महत्वाचा सिनेमा म्हणजे खलनायक. या सिनेमाने त्याला ओळख मिळून दिली. यातील गाणीही प्रचंड गाजली. आता ‘खलनायक रिटर्न्स’ येत आहे. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने खलनायक रिटर्न्सची पहिली झलक दाखवत अधिकृत घोषणा केली होती. सिनेमाच्या कास्टिंगसाठी अजूनही शोध सुरु आहे. दरम्यान सिनेमात सलमान खानही दिसणार असल्याची चर्चा आहे.
१९९३ साली खलनायक सिनेमा रिलीज झाला होता. सुभाष घईंनी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तर आता ३३ वर्षांनी खलनायक रिटर्न्सची घोषणा झाली आहे. सुभाष घई सिनेमाचे दिग्दर्शक नाही तर क्रिएटिव्ह कन्सल्टंट असणार आहेत. त्यांनी लेखकांच्या टीमसोबत मिळून प्लॅन केला आहे. सलमान खानला घेऊन टीमने त्याच्यासाठी पोलिसाची भूमिका तयार केली आहे. यामुळे सिनेमात संजय दत्त विरुद्ध सलमान खान दिसणार अशी शक्यता आहे. हे समजताच चाहतेही आतुर झाले आहेत.
सलमान खानच्या पोलिसाच्या भूमिकेचे सध्या प्लॅनिंग सुरु आहे. त्याची भूमिका कथेवर मोठी परिणाम करणारी असेल. एक असा पोलिस अधिकारी जो प्रामाणिक आहे आणि तो संजय दत्तच्या खलनायक भूमिकेला पाठिंबा देणारा आहे. या भूमिकेसाठी सलमानपेक्षा योग्य अभिनेता कोणी असू शकत नाही. सध्या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे. सलमानने याआधी सुभाष घईंसोबत युवराज सिनेमात काम केले होते. सिनेमाबद्दल सुभाष घईंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले सध्या काहीही बोलणे ही घाई होईल. कारण स्क्रिप्टिंगवर काम सुरु आहे. जेव्हा पूर्ण स्क्रिप्ट तयार होईल तेव्हा स्थिती स्पष्ट होईल.
















