31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeक्रीडाभारत-पाक सामना होणार?

भारत-पाक सामना होणार?

पाक पुढच्या २४ तासांत घेणार यूटर्न?

नवी दिल्ली : टी२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत साखळी फेरीत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना १५ फेब्रुवारीला ठरल्याप्रमाणे आहे. मात्र या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. यानंतर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला थेट इशारा दिला आहे. जर का पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असे असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ चे विधान समोर आले आहे. त्याने सांगितले की, पाकिस्तान भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय मागे घेऊ शकते. राशिद लतीफने भारतीय प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, पाकिस्तानला निर्णय बदलण्याची सवय आहे. राशिद लतीफने सांगितले की, पाकिस्तान आपला निर्णय मागे घेऊ शकते.

पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या बहाण्याने राजकीय पोळी भाजत आहे. मोहसिन नकवीच्या निर्णयाची पाकिस्तानात स्तुती होत आहे. राशिद लतीफने सांगितले की, पाकिस्तान आपला निर्णय मागे घेऊ शकते. आमच्या येथे तसंच होतं. यात काही अडचण नाही. आशा आहे की पडद्यामागून काही चर्चा होत असण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान सरकार कदाचित एकमेकांशी बोलत असावेत असे आम्हाला दिसत नाही पण तसेच होते. पुढच्या २४ तासात काहीही होऊ शकते. राशिद लतिफच्या वक्तव्यानंतर पु्न्हा एकदा पाकिस्तानचे पितळ उघडे पडणार असे दिसत आहे. पाकिस्तान जाणीवपूर्वक अशी स्थिती तयार करत असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानने भारताविरूद्धचा सामना खेळला नाही तर त्यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. स्पर्धेतील दोन गुण असेच जातील. त्याचबरोबर कोट्यवधींचे नुकसान होईल ते वेगळे.. पाकिस्तानला आयसीसी स्पर्धांमधून पैसे मिळतात. त्यामुळे बहिष्कार टाकला तर आयसीसीकडून मिळणारी वार्षिक रक्कमही मिळणार नाही. इतकेच काय तर द्विपक्षीय मालिकेतून सस्पेंड केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानची पूर्ण वाताहत होईल. २०२८ मध्ये टी २० वर्ल्डकपचे यजमानपदही मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच जगभरातील क्रिकेट बोर्ड पीएसएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना एनओसी देखील देणार नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR