31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeअंतरराष्ट्रीयवर्ल्ड बँक अध्यक्षांनी पाकला फटकारले

वर्ल्ड बँक अध्यक्षांनी पाकला फटकारले

मदत फुकट नाही, भारताकडून शिका डिजिटल पेमेंट, भ्रष्टाचार कसा थांबवला

इस्लामाबाद : पंजाबमधील जालंधर येथे जन्मलेले जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानने अंथरलेले रेड कार्पेट काही कामाचे ठरले नाही. बंगा यांच्या दौ-यादरम्यान पाकिस्तानने त्यांना खूश करण्यासाठी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

तरीही, बंगा यांनी कर्जाच्या मुद्द्यावर पाकिस्तानी मंत्र्यांना चांगलेच फटकारले. जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले की, पाकिस्तान कर्ज घेत आहे, पण ही मदत फुकट दिली जात आहे असे समजू नये. इस्लामाबादमध्ये पंतप्रधान शहबाज शरीफ आणि अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांच्या भेटीदरम्यान, जागतिक बँकेने पुढील १० वर्षांत पाकिस्तानला २० अब्ज डॉलर देण्याचा रोडमॅप (मार्ग नकाशा) तयार केला. यासोबतच बंगा यांनी पाकिस्तानी मंर्त्यांना सांगितले की, त्यांनी आपल्या देशातील भ्रष्टाचार आणि करचोरी थांबवावी. पाकिस्तानने सुधारणा केल्या नाहीत तर येत्या वर्षांत कोणीही कर्ज देणार नाही.

जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय पाल सिंह बंगा ४ दिवसांच्या पाकिस्तान दौ-यावर आहेत. अंतिम दिवशी, ३ फेब्रुवारी रोजी बंगा त्यांच्या वडिलोपार्जित गाव, पंजाबमधील खुशाब जिल्ह्यात जातील. १९४७ च्या फाळणीनंतर बंगा कुटुंबातील पहिले सदस्य आपल्या वडिलोपार्जित गावी जात आहेत. त्यापूर्वी त्यांनी गुरुद्वारा पंजा साहिबमध्ये माथा टेकला. एखाद्या भारतीयाच्या या भेटीवर यावेळी पाकिस्तानी माध्यमांनी कर्ज घेतल्यामुळे कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

१० वर्षांत २० अब्ज डॉलर मिळतील
अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांच्यासोबत तंत्रज्ञानावर चर्चा करताना बंगा यांनी कर्जाच्या तांत्रिक पैलूंवर आणि भविष्यातील प्रकल्पांवर चर्चा केली. बंगा यांनी कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कची पुष्टी केली, ज्या अंतर्गत पाकिस्तानला १० वर्षांत २० अब्ज डॉलर मिळतील.

भारताकडून शिकण्याचा सल्ला दिला
बंगा यांनी अर्थमंर्त्यांना नाव न घेता भारताकडून शिकण्याचा सल्ला दिला. बंगा म्हणाले की, एका देशाने आपल्याकडे डिजिटल पेमेंट प्रणाली आणि आधारमुळे करचोरी थांबवली आहे. त्याच्या डिजिटल पेमेंटच्या फॉर्म्युल्याला संपूर्ण जग स्वीकारत आहे. त्यांनी पाकिस्तानला आपले कर नेटवर्क डिजिटल करण्याचाही सल्ला दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR