नवी दिल्ली : ज्ञानव्यापी मशीदीच्या तळघरात हिंदू पक्षाला पुजेसाठी अलाहाबाद हायकोर्टाने परवानगी दिली. त्यामुळे ज्ञानवापी मशीद कमिटीला झटका बसला आहे. तसेच कोर्टाने वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. पण अर्जात सुधारणा करण्याचा सल्लाही दिला आहे.
हिंदू पक्षांना मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पूजा करण्याची परवानगी देण्याच्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका ज्ञानवापी मशीद समितीने अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली होती, या याचिकेवर अलाहाबाद हायकोर्टात आज सुनावणी पार पडली.
यावेळी हायकोर्टाने म्हटले की, १७ जानेवारीच्या आदेशाला आव्हान दिल्याशिवाय काहीही करता येणार नाही. यावेळी हायकोर्टाने वाराणसी कोर्टाच्या निर्णयाला स्थगितीचा अर्जही नाकारला आणि मशीद समितीला ६फेब्रुवारीपर्यंत अपिलात सुधारणा करण्यास सांगितले.