नांदेड : प्रतिनिधी
नीट पेपर फुटीमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत असून विद्यार्थी आणि विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. नांदेडच्या युवा सेना पदाधिका-यांनी आनंदनगर येथील आरसीसी कोचिंग क्लासेसच्या इमारतीवर धडक देत आक्रमक आंदोलन केले.
युवा सेनेच्या पदाधिका-यांनी आनंदनगर येथील आरसीसी क्लासेसच्या इमारतीसमोर असलेल्या बॅनरवर शाई फेक केली. यानंतर येथील बॅनर फाडून टाकले. तर पेपर फुटीचा सुत्रधार प्रा. मोटेगावकर याच्या फोटाला जोडे मारून आंदोलन केले. यावेळी पदाधिका-यांनी जोरदार घोषणाबाजी करत पेपरफुटीमधील सर्वच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. मोटेगावकर यास सीबीआयने अटक केल्यापासून नांदेड येथील संचालकांनी विद्यार्थ्यांना अघोषीत सुट्टी देवून येथील इमारतीला टाळे लावले आहे.
















