22.2 C
Latur
Tuesday, September 10, 2024
Homeसोलापूरमोहोळ येथे युवकांनी केले 'अर्धनग्न' आंदोलन

मोहोळ येथे युवकांनी केले ‘अर्धनग्न’ आंदोलन

सलग दुस-या दिवशी मोहोळ शहर कडकडीत बंद

मोहोळ / प्रतिनिधी
प्रशासनाची व शासनाची दिशाभूल करून मोहोळ तालुक्यातील अनगर हे गाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून नरखेड, पेनूर, शेटफळ व अनगर या चार मंडलातील ४६ गावातील लोकांना अनगर अपर तहसील कार्यालय हे सोयीचे व भौगोलिकदृष्ट्या योग्य असल्याचे सांगून अनगर येथे आमदार यशवंत माने यांनी प्रयत्न करून अपर तहसील कार्यालय मंजूर करून घेतले.

साहजिकच यामुळे मोहोळ शहर भग्न होते. यामुळे गेले तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनात शहरासह तालुक्यातील युवकांनी अर्धनग्न होत निषेध व्यक्त करत सदर अपर तहसील कार्यालय रद्द करावे, अशी विनंती शासनाला केली. अनगर येथे मंजूर असलेल्या अपर तहसील कार्यालयाच्या विरोधात मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र आले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सदर निर्णयाला तात्पुरती स्थगिती मिळवली. मात्र या निर्णयाचा कोणताही लेखी आदेश आले नसल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगताच पुन्हा एकदा अनगरच्या अपर तहसील कार्यालयाचा मुद्दा पेटला. या निर्णयाच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस तर या आंदोलनाला पांिठबा देण्यासाठी कालपासून मोहळ शहराच्या सर्व व्यावसायिकांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. सलग दुस-या दिवशी बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

दरम्यान, मोहोळ शहरासह तालुक्यातील युवकांनी मोहोळ शहर भग्न केले जाते असा आरोप करत अर्धनग्न आंदोलन केले. या आंदोलनात महेश देशमुख, सत्यवान देशमुख, सचिन जाधव, गणेश नाईक, बालाजी शिंदे, मयूर सूर्यवंशी, संग्राम जगताप, तात्या गवळी, दत्ता कोळी, सोमनाथ देशमुख, नागेश धोत्रे यांनी सहभाग नोंदविला.

अनगर येथे अपर तहसील कार्यालय झाल्यास मोहोळ शहरातील व्यवसाय उद्ध्वस्त होणार आहेत. यामुळे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनात मोहोळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत त्यांनी तहसीलदार व पोलिस स्टेशन यांना पत्र दिले असून अनगर येथील अपर तहसील कार्यालय त्वरित रद्द करावे अशी मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR