24.6 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeअंतरराष्ट्रीयझुकेरबर्ग २०० अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये, जगात तिसरा श्रीमंत!

झुकेरबर्ग २०० अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये, जगात तिसरा श्रीमंत!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मेटा प्लॅटफॉर्म्सचा सहसंस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्गची नेटवर्थ २०० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे. त्यामुळं झुकरबर्गनं जगातील श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत वरचं स्थान मिळवलं आहे. मार्क झुकरबर्ग या यादीत तिस-या स्थानावर आहे. तर, दुस-या स्थानी अमेझॉनचे जेफ बेजोस हे आहेत. पहिल्या स्थानी टेस्लाचा संस्थापक एलन मस्क आहे.

ब्लूमबर्ग बिलियनयर इंडेक्सने २५ सप्टेंबरला अब्जाधीशांची माहिती जारी केली, त्यानुसार एलन मस्क २६८ अब्ज डॉलर्ससह पहिल्या स्थानावर आहे. तर, जेफ बेजोसची नेटवर्थ २१६ बिलियन डॉलर्स आहे. तर, तिस-या स्थानी मार्क झुकरबर्ग असून त्याची नेटवर्थ २०० अब्ज डॉलर्स आहे. झुकरबर्ग पहिल्यांदा २०० बिलियन डॉलर्स संपत्ती असलेल्या अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. मार्क झुकरबर्गच्या संपत्तीमध्ये ७१ बिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे.

जेफ बेजोसची संपत्ती ३९.३ बिलियन डॉलर्स तर एलन मस्कची संपत्ती ३८.९ बिलियन डॉलर्सनं वाढली आहे. झुकरबर्ग मेटा प्लॅटफॉर्म्सद्वारे फेसबुक, व्हॉटसअप, इन्स्टाग्राम आणि थ्रेडस हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवते. सोशल मीडिया क्षेत्रात मेटाचं मोठं वर्चस्व निर्माण झालं आहे. त्यामुळं झुकरबर्गच्या संपत्तीत वेगानं वाढ झाल्याचा पाहायला मिळतं.

बर्नार्ड अरनॉल्ट २०० बिलियन डॉलर्सच्या क्लबपासून थोडे दूर राहिले. त्यांची सध्याची नेटवर्थ १८३ बिलियन डॉलर्स आहे. डेटाबेस कंपनी ओरॅकलचे लॅरी एल्लीसन यांची नेटवर्थ १८९ बिलियन डॉलर्स आहे. बर्नार्ड अरनॉल्टच्या संपत्तीत २४.२ बिलियन डॉलर्सची घट झाली आहे. तर लैरी एल्लीसनच्या नेटवर्थमध्ये ५५.६ बिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे.

भारतात मुकेश अंबानी १ नंबरवर
ब्लूमबर्ग बिलियनयर इंडेक्सनुसार भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी आहेत. रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमन मुकेश अंबानी यांच्या जवळ ११३ बिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. अदानी समुहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्याजवळ १०५ बिलियन डॉलर्सची संपत्ती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR