ओमान ते गुजरात गॅस पाईपलाईन

गॅस टंचाईवर मेगा प्लॅन, ४० हजार कोटींचा प्रकल्प
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मध्य-पूर्वेतील संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील तणावाचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. याचा मोठा फटका भारताला बसत असून, यावर भारताने ओमानच्या सहकार्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीला वळसा घालणारा एक मार्ग शोधला आहे. भारताला होणारा ऊर्जा पुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी गुजरात आणि ओमानदरम्यान एक लांब पाइपलाईन बांधण्याचा प्रकल्प जाहीर करण्यात आला. ही गॅस पाइपलाईन अरबी समुद्रातून सुमारे २ हजार कि. मी. लांब असणार आहे.

बदलणा-या भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताने आपला ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली आहेत. ओमान-गुजरात खोल समुद्रातील गॅस पाइपलाईन प्रकल्पावर गेल्या ३० वर्षांत अनेक वेळा विचार केला गेला. परंतु प्रचंड खर्च, तांत्रिक अडचणी आणि प्रकल्पाच्या फायद्यांबद्दलच्या प्रश्नांमुळे तो नियोजनाच्या पलीकडे कधीच गेला नाही. साऊथ एशिया गॅस एंटरप्राइज अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचा प्रचार करत आहे. या आधी समुद्रतळाचे सर्वेक्षण, तांत्रिक, आर्थिक अभ्यासही पूर्ण केलेला आहे.

या प्रकल्पासाठी अंदाजे ४० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाद्वारे जगातील सर्वात खोल सागरी मार्गामार्गे ओमानमधून थेट भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर (गुजरात) नैसर्गिक वायूची वाहतूक केली जाईल. या पाइपलाईनच्या बांधकामामुळे आखाती देश आणि भारत यांच्यात एक सुरक्षित थेट ऊर्जा मार्ग तयार होणार आहे. यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीचे अवलंबित्व कमी होईल.

समुद्रसपाटीपासून
३ किलो मीटर खोल
या पाइपलाईनचा काही भाग समुद्रसपाटीपासून ३ हजार मीटर (३ किमी) पेक्षा जास्त खाली टाकला जाण्याची शक्यता आहे. यामुळे भारताला आपल्या ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्यास मदत होऊ शकते, तसेच ओमानला एक स्थिर निर्यात बाजारपेठही मिळू शकेल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26

Latest news