अहमदपूर : डॉ. बासिदखान पठाण
तालुक्यातील विळेगाव येथील अरंिवद पंढरी तेलंगे या युवकाचा मृत्यू विळेगाव येथील कोल्हापूर बंधा-यात मिळून आला. त्याच्या वडिलांनी हा अकस्मात मृत्यू नसून अरंिवंदचे गावातच प्रेम प्रकरण होते.त्यामुळेच हा खुन झाला असल्याचे पोलिस अधिका-यांना सांगितले असतानाही किनगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला नाही त्यानंतर अरंिवद च्या वडिलांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे धाव घेतल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर किनगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
अरंिवद पंढरी तेलंगे राहणार विळेगाव तालुका अहमदपूर हा मुलगा २१ जानेवारी २०२४ रोजी कोणाचा तरी फोन आल्यावरून घरातून निघून गेला तो परत आलाच नाही दि. २३ जानेवारी २०२४ रोजी गावातील कोल्हापुरी बंधा-यात त्याचा मृतदेह आढळून आला. यावरून मृताचे वडील पंढरी यांनी घातपाताचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला माझ्या मुलाचे गावातीलच मुलीसोबत संबंध होते सदरील संबंध त्यांच्या घरच्यांना मान्य नसल्यामुळेच हा घात पात झाला असल्याची माहिती पोलीस अधिका-यांना दिली तरीही गुन्हा नोंद करण्यात आला नाही. या प्रकरणी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाद मागावी लागली. सदरील प्रकरणात न्यायालयाने आदेश पारित केल्यानंतर सदरील आदेश घेऊन किनगाव पोलीस ठाणे येथे गेलो असता त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले.
विभागीय पोलिस अधिका-यांना फोन करून संपर्क साधला व सहाय्यक पोलीस निरीक्षक बाहुसाहेब खंदारे हे न्यायालयाचे आदेश असुनही गुन्हा दाखल करत नसल्याची माहिती दिल्यानंतर माझ्या अर्जावरुन गावातील दिगंबर सोपान तेलंगे, राम गंगाधर तेलंगे, साईनाथ सोपान तेलंगे, अर्चना दिगंबर तेलंगे, शितल साईनाथ तेलंगे, अंजली दिगंबर तेलंगे व अंजलीचे दोन मामा व इतर नातेवाईकांवर दि.१३ मार्च २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय अधिकारी मणिष कल्याणकर हे करित आहेत.