नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनचे वर्चस्व मोडण्याची तयारी भारतीय उद्योगपती रतन टाटा यांनी केली आहे. रतन टाटा यांच्या या पावलामुळे चीनला घाम फुटला आहे. चीनच्या नाकावर टिच्चून सरळ त्यांच्या सीमेजवळ २७,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम सुरु केले आहे.
रतन टाटा यांच्या टाटा कंपनीच्या या पावलामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनची असलेली मक्तेदारी संपणार आहे. टाटा सन्स लिमिटेडचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात २७,००० कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्चरिंग प्लॅन्टची सुरुवात केली. या प्रकल्पातून रोज ४.८३ कोटी चिप तयार होणार आहेत.
टाटा समूहच्या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मंजुरी दिली होती. त्यानंतर सेमीकंडक्टरच्या प्लॅन्टचे आता भूमीपूजन झाले आहे. चीन सीमेजवळ टाटा यांचा हा प्रकल्प सुरु होत आहे. यामुळे चीनमधील सिट्टीपिट्टीचे सेमीकंडक्टर क्षेत्रात असणारे वर्चस्व संपणार आहे. सध्या सेमीकंडक्टर बनवणारा चीन जगातील सर्वात मोठा देश आहे. सेमीकंडक्टरचा वापर कार, मोबाइलसह सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणात केला जातो.
सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी टाटा समुहाने चीन सीमेजवळ प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पासाठी आसाम सरकारसोबत ६० वर्षांचा करार करण्यात आला आहे. २७,००० हजार कोटींची गुंतवणूक करुन रोज ४.८३ कोटी चिपची निर्मिती करण्यात येणार आहे. चिप निर्मितीच्या या प्रकल्पामुळे भारत सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होणार आहे. भारताच्या या आत्मनिर्भरतेमुळे चीन अस्वस्थ झाला आहे. कारण या क्षेत्रातील चीनचा दबदबा संपणार आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनसोबत कोरिया आणि तैवानचे वर्चस्व आहे.