देशात अराजकता वाढली

संगमनेर : प्रतिनिधी
भाजपप्रणीत सरकारच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि अराजकता वाढीस लागल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सोशल मीडियावर चर्चेत असलेली ‘कॉक्रोच पार्टी’ ही सुद्धा जनतेच्या असंतोषाचेच प्रतीक असल्याचे वक्तव्य करत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

संगमनेर येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि अमृत उद्योग समूहाला भेट दिल्यानंतर सपकाळ बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे आणि शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले की, बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे अत्यंत निष्ठावान आणि अनुभवी नेतृत्व आहे. त्यांनी विविध जबाबदा-या कार्यक्षमतेने सांभाळल्या असून, त्यांच्या जाणत्या नेतृत्वाची आज राज्याला गरज आहे. एका निवडणुकीवर कोणाचे मूल्यमापन होत नाही. इतिहासात अनेक मोठ्या नेत्यांच्या आयुष्यात चढ-उतार आले, पण त्यानंतरचा टप्पा अधिक मोठा ठरला आहे असे सूचक विधानही त्यांनी केले.

राजकारणात स्वच्छ प्रतिमा आणि पारदर्शक कारभाराचे उदाहरण म्हणून थोरात यांचा उल्लेख करत सपकाळ म्हणाले, ‘दूध का दूध और पानी का पानी’ या उक्तीप्रमाणे प्रामाणिक आणि स्वच्छ राजकारण करणारे बाळासाहेब थोरात हे विचारांनी आणि आचारांनी समृद्ध नेतृत्व आहे. मोठा जनाधार लाभलेल्या या नेतृत्वाकडून राज्याला अजून अपेक्षा आहेत.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. देशात डिझेल-पेट्रोलचा तुटवडा निर्माण होत असल्याचा दावा करत त्यांनी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. खरीप हंगाम तोंडावर असताना सरकारने शेतक-यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
एसआयआर मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेबाबत बोलताना थोरात यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बूथ स्तरावर सक्रिय होण्याचे आवाहन केले. ‘बीएलओ-२ची भूमिका निभावत मतदार नोंदणीमधून एकही नागरिक वंचित राहणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश त्यांनी दिले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Shivraj motegavkar|मोटेगावकरची सोन्याची लंका; आदर्श कॉलनीत निर्माण होतंय शिश महल...
02:25
Video thumbnail
Latur|लातुरात मोकाट कुत्र्यांविरोधात गांधीगिरी आंदोलन;प्रभुराज प्रतिष्ठानचे अनोखे आंदोलन चर्चेत
02:15
Video thumbnail
Shivraj Motegavkar|NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा नवा व्हिडिओ व्हायरल..
01:43
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; 14 लाखांचा घातक शस्त्रसाठा जप्त
02:39
Video thumbnail
Latur|NEET प्रकरणानंतर प्रशासनाचे डोळे उघडले;“क्लासेस, मेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश
06:48
Video thumbnail
Latur|विश्वजीतची संघर्षगाथा; मृत्यूशी झुंज देत NEET ची तयारी,डोळ्यात अजूनही डॉक्टर होण्याचं स्वप्न
06:21
Video thumbnail
डिझेल टंचाईमुळे जिंतूर तालुक्यात शेतकरी हैराण; बोरी येथील पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकण्याची वेळ
02:45
Video thumbnail
बिलोली उपजिल्हा रुग्णालयात संतापजनक प्रकार! गॅस संपल्याच्या बहाण्याने किचन बंद; रुग्ण उपाशी ?
04:25
Video thumbnail
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा वाघ हल्ला; सिंदेवाही जंगलात ४ महिलांचा जागीच मृत्यू
00:30
Video thumbnail
५ जूननंतर नांदेड शहरात रस्त्यांची कामे होणार नाहीत; मान्सूनपूर्व बैठकीत मनपा आयुक्त यांचे संकेत
02:33
Video thumbnail
मध्यरात्री काळजाचा ठोका चुकला! माहूरच्या बाबा सोनापीर दर्गा परिसरात बिबट्याचे दर्शन
01:48

Latest news