१२ वर्षांत १२ मोठे निर्णय, ४३९९ दिवस सेवा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीची १२ वर्षे अर्थात तपपूर्ती आज ९ जून रोजी पूर्ण झाली. देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ ४,३९९ दिवस सलग सेवा देणारे मोदी हे पहिलेच निर्वाचित पंतप्रधान ठरले आहेत. या १२ वर्षात मोदींनी कलम ३७० ते राममंदिरापर्यत अनेक मोेठे निर्णय घेतले आहेत. विशेषत: १२ वर्षांत १२ मोठे निर्णय घेतले आहेत.
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान जन धन योजना (ऑगस्ट २०१४) सुरू केली. देशातील कोट्यवधी गरिबांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) च्या सोयीसह ही योजना सुरू केली. स्वच्छ भारत अभियान (ऑक्टोबर २०१४) वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी देशभरात कोट्यवधी शौचालयांची निर्मिती करून हागणदारीमुक्त भारत हे ध्येय साध्य करण्यात आले.
सर्जिकल स्ट्राइक (सप्टेंबर २०१६) बालाकोट एअर स्ट्राइक (फेब्रुवारी २०१९) सीमापार दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराने आणि हवाई दलाने केलेले धाडसी लष्करी हल्ले, नोटाबंदी (नोव्हेंबर २०१६), काळा पैसा आणि बनावट नोटांना आळा घालण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या चलनी नोटा एका रात्रीत रद्द करून नवीन नोटा आणल्या.
आयुष्मान भारत योजना (सप्टेंबर २०१८) आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देणारी जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना सुरू झाली. तिहेरी तलाक बंदी कायदा (जुलै २०१९) मुस्लिम महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी तिहेरी तलाक (तलाक-ए-बिदत) ही प्रथा बेकायदेशीर आणि फौजदारी गुन्हा ठरवण्यात आली. कलम ३७० रद्द करणे (ऑगस्ट २०१९) जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून त्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्यात आले. राम मंदिर निर्माण आणि निकाल (नोव्हेंबर २०१९) सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीला अधिकृत सुरुवात झाली.डिजिटल इंडिया आणि यूपीआय क्रांती (२०१४-२०२६ दरम्यान गती) युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून देशाच्या कानाकोप-यात डिजिटल पेमेंट व्यवस्था मजबूत करण्यात आली.
आयुष्मान भारत योजना
सप्टेंबर २०१८ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबानां ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देणारी जगातील सर्वांत मोठी आरोग्य विमा योजना मोदी सरकारने सुरू केली.
सर्जिकल स्ट्राईक
बालाकोट एअर स्ट्राईक (फेब्रुवारी २०१९) सीमापार दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराने आणि हवाई दलाने धाडसी हल्ले करून पाकचे कंबरडे मोडले.
तिहेरी तलाकबंदी कायदा
जुलै २०१९ मध्ये मुस्लिम महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी तिहेरी तलाक ही प्रथा बेकायदेशीर आणि फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला.
कलम ३७० रद्द
ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून त्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्यात आले.
एक देश, एक कर प्रणाली
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी, जुलै २०१७) देशातील अनेक अप्रत्यक्ष कर रद्द करून एक देश, एक कर ही ऐतिहासिक करप्रणाली लागू करण्यात आली.
मोदी सरकारकडून
नुसतीच आश्वासने
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या १२ वर्षांत वारेमाप आश्वासने दिली. मात्र लोकांचे जीवन बदलण्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस कृती झाली नाही, असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला. त्यासाठी ‘आश्वासनेविरुद्ध वास्तव’ या आशयाचा दस्तावेज प्रसिद्ध केला. पक्षाच्या संशोधन विभागातर्फे ७५ पानी दस्तावेजात सरकारवर विविध आरोप करण्यात आले. ज्येष्ठ नेते राजीव गौडा व अमिताभ दुबे यांच्या हस्ते तो प्रकाशित करण्यात आला.
















