लातूर : प्रतिनिधी
लातुर जिल्ह्यात वृक्ष आच्छादनाचेप्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने यावर्षी माझ लातुर- हरीत लातुर या संकल्पनेअंतर्गत १.४० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे. त्यानुषंगान ेविविध दिनांचे ऑचित्य साधुन वृक्ष लागवड ग्रामपंचायतीमध्ये मोठया प्रमाणात केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वट-पौर्णिमा दिवशी गावातील प्रत्येक महिलांनी किमान एक वडाचे झाड लावून त्याचे संवर्धन करावे. तसेच याच दिवशी प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत किमान १०० वडाची झाडे लाऊन त्याची जोपासना करावी असे आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले होते. या उपक्रमामध्ये गावातील नागरिक, कर्मचारी, बचतगट, तरुण मंडळ, स्वयंसेवी संस्था व महिलांनीही आपले योगदान देत ग्रामिण भागातील महिलांनी वट पौर्णिमेनिमित्त २५ हजार पेक्षा जास्त वट वृक्षाची लागवड करुन उदंड प्रतिसाद दिला.
वटपौर्णिमेनिमित्त जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या
संकल्पनेतून महिलांनी प्रत्येक गावात कमीतकमी १० ते १०० वट वृक्ष महिलांच्या हाताने लावून संपुर्ण जिल्हयात वटपौर्णिमा महिलांनी उत्साहात साजरी केली. यावेळी स्वत: जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसमवेत जिपच्या विविध विभागाचे विभाग प्रमुख यांनी त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात भेटी देवून वृक्ष लागवड विशेष अभियान अंतर्गत वड, आंबा, पिंपळ, लिंब, जांभुळ, चिंच व करंज यासारकख्या झाडांची शाळा, अंगणवाडी, दवाखाने, गावातील शासकिय ईमारतीचा परीसर, स्मशानभुमी, दहन व दफनभुमी, गावांतर्गत रस्ते या ठिकाणी १ लाख २३५ पेक्षा जास्त आज रोजी वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अहमदपूर तालुक्यातील देवकरा,परचंडा,काजळहिप्परगा वकिनगाव या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देवून वृक्ष लागवड अभियानांतर्गत ग्रामपंचायत शाळा व शासकिय ईमारतीच्या ठिकाणी त्यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वृक्ष लागवड करण्यात आली.